Press "Enter" to skip to content

धक्कादायक… संतापजनक !

इंडिया बुल्स येथे क्वारंटाईन असलेल्या महिलेवर बलात्कार


सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)

पनवेल परिसरातील कोरोना संशंयीतांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था पनवेल जवळील कोन येथील इंडिया बुल्स या इमारतीत करण्यात आली आहे. परंतु या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची घटना घडल्याने महिला रूग्णांमध्ये खळबळ उडाली आहे.
         इंडिया बुल्स या इमारतीमध्ये पनवेल परिसरासह नवी मुंबई येथील क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांची सोय केली जाते. या इमारतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्वारंटाईन हे उपचारासाठी किंवा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येते. परंतु तेथे एका तरुणाने आपली विक्रृती दाखवली आहे. क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयीत म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर या तरूणाने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडला असून यातील आरोपी युवक हा भगतवाडी सुकापूर परिसरात राहणारा आहे. तर सदर महिला ही खारघर येथे राहणारी आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांनी याबाबत तत्काळ कारवाई करत भादंवि कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि नितीन पगार करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.