Press "Enter" to skip to content

सरकारने लावली सामान्य माणसांच्या खिशाला कात्री

गॅस सिलिंडरच्या किंमतीत एक महिन्यात दोन वेळा वाढ

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

एक महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत ‌प्रचंड मोठया प्रमाणावर वाढ झाली असून सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागली आहे.यामुळे अगोदर महागाईने त्रस्त झालेली जनतेला गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने बिकट परिस्थिती सामना करावा लागत आहे.

मार्च महिन्यानंतर कोरोना विषाणुच्या प्रादुभावामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला.यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक व्यावसाय बंद पडले.या नंतर जुन महिन्यात निसर्ग चक्रीवादळा अनेकांची घरे उधोस्थ झाली.काही ना नुकसान भरपाई तर अनेकांना भरपाई अद्याप मिळाली नाही.तर नंतर या सर्व परिस्थिती वर मात करत शेतकरी वर्गाने आपल्या भातशेतीची लावणी केली.परंतु पीक चांगले येऊन हि अखेर पावसाने सर्वत्र पीक हिरावून नेले असे संकटाचा सामना करता करता सर्वसामान्यांच्या नाकात दम आला.

सर्व संकटाचा सामना करीत हळूहळू परिस्थिती थोडया प्रमाणात सुधारीत असतांना कांदा बटाटा या जिवन आवश्यक वस्तुची मोठया प्रमाणावर वाढ झाली.यानतर गॅस सिलिंडरच्या किंमतीत १ डिसेंबर ५० रुपये तर १५ डिसेंबर रोजी ५० रुपये असे एकच महिन्यात १०० रुपये अशी मोठी वाढ झाली आहे.तर याउलट गॅस सिलिंडरवर मिळणारी सबशिडी बंद करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांचे या महागाईने कंबरडेच मोडले आहे.असे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.