Press "Enter" to skip to content

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु

–नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बैठकीत माहिती मुंबई, दि.23:

राज्याच्या विकास कामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र आणि राज्याने एकत्र बसून मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल.दरम्यान कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेडबाबत राज्य शासनाची भूमिका मांडली.यावेळी विधानपरिषदेच्या सदस्या मनीषा कायंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील उपस्थित होते.

नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, लोकांच्या हिताला प्राधान्य देताना विकास प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असते. मेट्रो कारशेडबाबत केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र शासन अनुकुलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रेा कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु आहे. कांजूरमार्गची 40 हेक्टरची जागा ही ओसाड आहे.भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला करण्याचे प्रस्तावित होते. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो 3,4 आणि 6 या लाईन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे. तीनही लाईनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाईन नेणे शक्य होणार आहे. मात्र या जागेसाठी राज्य सरकारविरोधात केंद्र सरकार (खार जमीन आयुक्त) न्यायालयात गेले असल्याने आणि सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत अधिक बोलता येणार नसल्याचेही नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.तसेच सामाजिक कार्यकर्ते जगदीश घरत, तुषार भगत, भूषण म्हात्रे, नितीन चोरघे आदी मान्यवरांनी देखील सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात पुढाकार घेतला.

विविध असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे संदीप पाटील यांच्याकडे मागणी केली आहे की सिडको द्वारे केल्या जाणाऱ्या निकृष्ट कामांचे बाबत आपण लक्ष द्यावे. त्यानुसार येत्या दोन दिवसात संदीप पाटील सिडको अधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार असून याबाबत जाब विचारणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.