Press "Enter" to skip to content

पनवेल तालुक्यात कोरोना रुग्णांचा नवा रेकॉर्ड आज 207 रुग्ण

मृत्यूने शंभरी पार केली : कोरोनाने घेतला 106 रुग्णांचा बळी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांनी आज नवा रेकॉर्ड स्थापन केला. आज दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 145 तर ग्रामीण भागात 62 रुग्ण सापडले आहेत. चिंतेची बाब म्हणजे आत्तापर्यंत पनवेल तालुक्यातील 106 जणांचा कोरोना ने बळी घेतला आहे. यात महानगरपालिका क्षेत्रातील 83 तर ग्रामीण भागातील 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात आजमितीला 540 तर महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 1146 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील 1629 तर ग्रामीण भागातील 699 रूग्ण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान पनवेल मध्ये पुन्हा एकदा लॉक डाऊन केल्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होईल अशी अपेक्षा पनवेलकरांना होती. मात्र अद्याप तरी कोरोना वर नियंत्रण ठेवण्यात यश आले नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.