Press "Enter" to skip to content

धक्कादायक : ४० कामगारांना कोरोना होवून कंपनी होती सुरू

नगरसेवकांच्या धाडसी निर्णयाने अन्य कामगाराना कोरोना बाधित होण्यापासून रोखले : कंपनीला ठोकले कुलूप

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली/ विकास पाटील

पनवेल महानगपालिका हद्दीतील तळोजा औद्योगिक विभागात असलेल्या अँक्युप्रिट कंपनीमधील ४० कामगारांना कोरोना झाल्याची माहिती नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने कामगारांचे जीव वाचविताना प्रथम कामगाराना बाहेर काढून कंपनी बंद केली. त्यानंतर या कंपनी विरोधात पनवेल महानगरपालिकेकडून ठोस पावले उचलण्यात येवून कंपनीला कुलूप ठोकण्यात आले. या कंपनी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी  व पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे  केली आहे.

पनवेलमध्ये कोरोनाने कहर केला असून वाढत्या रुग्ण संख्येने पनवेलकरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा भयानक परिस्थिती तळोजा औद्योगिक वसाहतीतील बिनधास्त कारखाने चालू असून ब-याच कंपन्यामध्ये  कोरोना तपासणीची यंत्रणा कार्यरत नाहीत. त्यामुळे  एखाद्या कामगाराला कोरोना झाला तर त्याच्यामुळे कंपनीतील सर्व कामगार कोरोनाने संक्रमित होवून जीवाला मुकू शकतात. असाच भयानक प्रकार अँक्युप्रिंट कंपनीत घडला. या कारखान्यात 40 च्या आसपास कामगारांना कोविड -19 झाल्याचे आढळून आले. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची माहिती मिळताच नगरसेवक ज्ञानेश्वर यांनी धाडसी निर्णय घेवून अन्य कामगारांना कोरोना पासून रोखताना त्यांना कंपनीतून बाहेर काढण्यात येवून कंपनी बंदच करण्यात आली. या कंपनी विरोधात पालिकेने तातडीने कारवाई करत कंपनीला कुलूपच ठोकले आहे. कारखाना मालकांना कामगारांच्या जीवाशी काहीही घेणे देणे नसून त्यांच्या मजबूरीचा फायदा घेवून जीवाशी खेळत आहेत. अशा कंपनी मालकांवर कडक कारवाई करून कामगारांचे जीव वाचवावे अशी मागणी नगरसेवक ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेलचे प्रांतधिकारी यांच्याकडे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.