Press "Enter" to skip to content

डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा


तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तर्फे प्रवेश प्रक्रियेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार ।

शैक्षणिक वर्ष २०२०-२१करीता तीन वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एस एस सी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खाजगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम व थेट द्वितीय वर्षांच्या प्रवेशद्वाशसाठी विकल्प अर्ज भरून निश्चित करणे ,कँप जागा वाटप, झालेले जागा वाटप स्वीकारण्या पूर्वी स्वतः पडताळणी करणे जागा वाटप स्वीकारणे ,जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उमेदवारांनी राहणे या प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत जाहीर करण्यात आले असून,
डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

★जागा जाहीर करणे – ११ डिसेंबर

★अभ्यासक्रम पसंती क्रम भरणे व निश्चित करणे -१२ते १४डिसेंबर

★पहिल्या फेरीच्या तात्पुरत्या जागा वाटप -१६डिसेंबर

★कॅपद्वारे वाटप जागेचा स्वीकार करणे १७ व१८ डिसेंबर

★कागदपत्रे सादर करून प्रवेश घेणे १७ ते १९ डिसेंबर

★ दुसरी प्रवेश फेरीसाठी जागा जाहीर करणे २०डिसेंबर

★ विद्यार्थ्यांचा पसंती क्रम भरणे व निश्चित करणे-२१ ते२२डिसेंबर

★ दुसऱ्या फेरीच्या तात्पुरत्या जागा वाटप २४ डिसेंबर

★ कॅपद्वारे वाटप जागेचा स्वीकार करणे,२५व २८ डिसेंबर

★ कागदपत्रे सादर करून प्रवेश घेणे २५ ते २९ डिसेंबर

सदर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालयानाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून,विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चित करता येतील

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.