Press "Enter" to skip to content

मोठे भिंगार गावात सापडला दुर्मिळ रंगहीन (Albino) कवड्या सर्प

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

दि. 4 डिसेंबर 2020 रोजी. रात्री 7:45 वाजता. मोठे भिंगार येथे राहणारे विनायक बळीराम कोंडीलकर, यांनी मोबाईल फोन द्वारे नेचर फ्रेंड सोसायटी या संस्थेचे सर्पमित्र संदेश पवार आणि प्रतिक शेंद्रे यांना घरात सफेद रंगाचा साप आला आहे. अशी माहिती दिली. माहिती मिळताच संदेश पवार आणि प्रतिक शेंद्रे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा रंगहीन (Albino) कवड्या सर्प आहे. लगेच त्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. आणि वन विभागच्या मार्गदर्शनानुसार मोठे भिंगार येथील वनविभागाच्या जंगलात रंगहीन (Albino) कवड्या सापाची सुखरूप रित्या मुक्तता केली…

Albino सर्प म्हणजे यामध्ये त्वचेचा रंग पूर्ण पांढरा ,गुलाबी,पिवळा असतो.व डोळे लाल,गुलाबी रंगाचे असून जीभसुद्धा लालसर,गुलाबी पहावयास मिळते.या स्वरुपाच्या सर्पाच्या डोळ्यातील ( Iris ) या भागामुळे डोळ्यांचा रंग निश्चित होतो Iris मध्ये असणारे Pigments याला कारणीभुत असतात. Albino सर्पा मध्ये Iris मधले Pigments कमी असतात.किंवा पूर्णत: त्याचा अभाव असू शकतो.यामुळे डोळ्याचा रंग हा लालसर किंवा गुलाबी दिसतो. Albino सर्पा मध्ये Retina ची वाढ पूर्णपणे होत नाही. ( Poorly Developed ) त्यामुळे द्रुष्टी सुद्धा कमी असते.द्रुष्टी हीणतेमध्ये पूर्ण ( Blindness ) द्रुष्टी हिणता किंवा थोड्या प्रमाणात द्रुष्टी हिणता ( Visual im Pairment ) असु शकते.जीभेचा रंग देखील Pure Albino मध्ये लालसर किंवा गुलाबी असा आढळतो .

( Skin) त्वचेमुळे असणाय्रा Milanin या रंग द्रव्याच्या पूर्णत: अभावामुळे किंवा कमतरतेमुळे त्वचेचा रंग पांढरा,गुलाबी,पिवळा असे बदल पहावयास मिळतात. Pure Albino मध्ये Milanin ची पूर्णत: कमतरता असते व त्यामुळे पूर्ण पांढरा रंग येतो. Milanin थोड्या प्रमाणात असेल तर गुुलाबी किंवा पिवळा रंग येतो याला Partial Albino म्हणतात.त्वचेमध्ये Dermis या भागात Milanin Unit मधील Milanocytes मुळे त्वचेला मुळरंग प्राप्त होत असतो. Albino मध्ये ह्या Milanin Units मध्ये Melano cytes चा पूर्णत: अभाव किंवा प्रमाण पहावयास मिळते.

अल्बिनो साप हा जास्त दिवस जगत नाही. कारण अशा स्वरुपाच्या सर्पांना प्रखर सुर्याचा प्रकाश सहन होत नाही.तसेच इतर क्रुञीम प्रकाश देखील त्यांना ञासदायक ठरु शकतात. त्याचप्रमाणे डोळ्यानांही प्रकाशाचा ञास होतो व पांढरा,पिवळा,गुलाबी असा शरीराचा रंग असल्याने निसर्गात ते सहज नजरेस पडतात .त्यामुळे इतर भक्षकांना सहज प्राप्त होते. त्यामुळे अशा स्वरुपाचे सर्प निसर्गात जास्त काळ लपून राहू शकत नाहीत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.