Press "Enter" to skip to content

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सुस्साट…

भाजपाच्या हातातुन पुणे – नागपुर गेले : भाजपाला धक्का, ६ पैकी ५ जागा महाविकास आघाडीकडे

सिटी बेल लाइव्ह । नागपूर – पुणे ।

यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे.

पुणे पदवीधर मतदार संघात पहिल्याच पसंती क्रमांकाची तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते घेऊन , महा विकास आघाडीचे अरुण गणपती लाड विजयी झाले आहेत.त्यांनी 48 हजार 824 मतांनी बीजेपीचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली.
पदवीधर करिता २ लाख 47 हजार 50 इतके मतदान झले होते. एकूण मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी 57. 96 टक्के इतकी होती. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. मतमोजणीत यापैकी 2 लाख 28 हजार 272 हे वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास 1 लाख 14 हजार 137 हा विजयी कोटा ठरविण्यात आला. एकूण 112 टेबल वर ही मतमोजणी सुरू होती. अपेक्षेप्रमाणे ही मतमोजणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत चालेल असे बोलले जात होते.

मात्र पहिल्याच पसंती क्रमांकात लाड यांनी तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळवून आपला विजय निश्चित केला. पदवीधर निवडणूक च्या निकषानुसार वैध मतांच्या 50 टक्के अधिक 1 अशी मते लाड यांनी मिळविल्याने शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास लाड यांचा विजय निश्चित झाला आहे. सकाळी 10 वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकारी यांच्याकडून त्यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

तर शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर यांची विजयाकडे घोड़ दौड सुरू; अधिकृत निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्येही महाविकास आघाडी जिंकली

विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पाचही फेऱ्यांत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला.

महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव केला. आज दुपारी पार पडलेल्या मतमोजनीनंतर त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. ॲड. अभिजित वंजारी यांना ६१ हजार ७०१ मत तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली.

मराठवाडा पदवीधरमध्ये सतीश चव्हाण विजयी, बोराळकरांवर केली मात

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

मराठवाडा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट्ट्रीक

मराठवाडा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला आहे. विजयानंतर चव्हाण यांनी पदवीधर मतदारांचे आभार मानले आहेत. निवडणुकीत चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत, तर बोराळकरांना ५८ हजार ७४३ मते घेतली आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.