Press "Enter" to skip to content

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर

कामगार नेते महेंद्र घरत यांची समितीवर निवड

सिटी बेल
मुंबई, दि. १ डिसेंबर
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य स्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे.
या १३ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी खुद्द प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत. समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत,प्रकाश मुगदिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, प्रविण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश पातळीवरील या कमिटीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे देखील काँग्रेस च्या वतीने सांगण्यात आले.
कामगार क्षेत्रात प्रभावी पणे काम करत आपला ठसा उमटवणारे महेंद्र घरत यांच्या सारख्या नियोजनाच्या बाबतीत मास्टर माईंड असणाऱ्या नेत्याची या समितीमध्ये वर्णी लागल्याने कामगार क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.गेल्या सहा वर्षांत काँग्रेस ची होणारी पीछेहाट पाहता अशा समिती ची नितांत आवश्यकता होती.बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या व्हिजनरी नेत्याच्या थेट कंट्रोल मुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अनपेक्षित धक्का देत मुसंडी मारण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.