Press "Enter" to skip to content

अन्यायकारक लाॅकडाऊन विरोधात व्यापारी एकवटले

व्यापारी असोसिएशनची पनवेल महानगरपालिकेकडे लाॅकडाऊन रद्द करण्याची मागणी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकदा केलेला लॉकडाउन अन्यायकारक असून तो त्वरित रद्द करावा अशी मागणी पनवेल व्यापारी असोसिएशन तर्फे महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना महारामारीच्या अनुषंगाने लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. मात्र लॉकडाउन सुरु असताना देखील आकडेवारी काही कमी होण्याचे नाव घेत नसताना आता पुन्हा लॉकडाउनची मुदत वाढविण्यात आली आहे. या लॉकडाउन मध्ये कपडे, हार्डवेअर, फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स प्लायवूड, आदींचे दुकाने बंद असल्याने दुकान मालकासह कर्मचारीवर्ग यांचा स्वतःचा वयक्तिक खर्च करताना आमचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतीतील लॉकडाउन हटविण्यात यावे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हिड सदृश परिस्थिती पाहता प्रशासनाने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपासून शासनाकडून अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली. परंतु परिस्थिती नियंत्रणात नसल्याने पुन्हा महानगरपालिका हद्दीत लॉकडाऊन करण्यात आला. गेले 10 दिवस कडक लॉक डाऊन अगदी दुकानांमध्ये काउंटर सेलला देखील बंदी घालण्यात आली. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी करण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. कोरोना पेक्षा आर्थिक संकट व हतबलतेने नागरिक अधीक त्रस्त आहेत. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने जगायचं कसे असा प्रश्न कपडे, हार्डवेअर, फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, प्लायवूड च्या सर्व व्यापारी असोशिएशनचे कामगारासह दुकान मालक हतबल झाले आहेत.

पहिल्या अनलॉकडाउन नंतर व्यापारी हळूहळू दुकाने सुरु करीत होते. मात्र पनवेल महापालिकेने पुन्हा लॉकडाउन घेतल्यामुळे आमचे नुकसान वाढत चालले आहे. दुकाने बंद असली तरी जागेचे भाडे, दुकानाचे वीजबिल, कामगारांचे पगार, त्याचबरोबर मुलांच्या शाळेच्या फी साठी लागणारे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न व्यापाऱ्यासमोर पडला आहे. फूटवेअर वाल्याकडे रेनी शूज आहे. तो विकला जाणार नाही. तसेच कपडे वाल्याकडे रेनकोट आणि छत्री शिल्लक राहिले आहे. ते यापुढे विकला जाणार नाही. त्याचबरोबर पडून राहिलेल्या मालाचे नुकसान होण्याची दात शक्यता आहे. आमच्या कर्मचारी कामगारवर्गासह स्वतःचा वयक्तिक खर्च करताना आमचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळॆ पालिकेने लॉकडाउन बाबत पुन्हा विचार करावा आणि लॉकडाउन हटविण्यात यावे अशी मागणी आमच्या कपडे, हार्डवेअर, फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स प्लायवूड असोशीएशनच्या वतीने आपल्याकडे करीत आहोत.

कोरोनापेक्षा भुकेने मरणार्यांचे प्रमाण वाढेल

पनवेल महापालिकेने घेतलेल्या लॉकडाउनमुळे संपूर्ण बाजारपेठेवर झाला आहे. व्यापाऱ्यासमोरही अनेक समस्यां आहेत. दुकानात काम करणारे अनेक कर्मचारी गावी निघून गेले आहेत. तर जे आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. अशा कर्मचारी आणि व्यापाऱ्यासाठी सरकारसह पनवेल महापालिकेने सहकार्य केले पाहिजे. लॉकडाउन असाच वाढत राहिला तर कोरोनापेक्षा भुकेने मरणार्यांचे प्रमाण वाढेल.

सदर निवेदन फूटवेअर रिटेलर्स असोशिएशन चे अध्यक्ष आशिष गाडा,
प्रतीक गाळा हार्डवेअर आणि प्लाऊड असोसिएशन चे अध्यक्ष दिनेश जैन, मुफादल वारा इलेक्ट्रॉनिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जेसवानी कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजु सचदेव, मुकेश शहा यांनी दिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.