Press "Enter" to skip to content

कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका -भाई मोहन गुंड

पिक कर्जासाठी बँकेंन कडून कागदपत्राच्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा – शेकाप

सिटी बेल लाइव्ह / बीड (प्रतिनिधी)


जिल्ह्यामध्ये जवळपास पेरणी झालेली आहे गेली चार वर्षा पासून कधी अतिवृष्टीने तर कधी कमी पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे, एकमेव शेतकऱ्याला आधार म्हनजे पिक कर्ज बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा या साठी शेकापच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेआहे,

जिल्ह्यातील राष्ट्रीय अधिकृत बँकेकडून अनावश्यक कागदपत्रची मागणी करत शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्र घ्या, मागील वर्षी कर्जमाफी मध्ये येऊन देखील अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नसल्याचे निदर्शनात आले आहे त्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ द्या, दीड लाखा पेक्षा कमी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याच्या सातबारा वर बोजा चढऊ नये, कर्ज माफीचा लाभ सर्व शेतकऱ्याला व्हावा. ज्या शेतकऱ्यांना मागील वर्षी कर्ज मिळाले नाही अशा नवीन शेतकऱ्यांना देखील कर्ज वाटप करावे, विनाकारण कागदपत्राच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अन्यथा जिल्हाआधिकारी कार्यालया समोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या वेळी शेकापचे भाई मोहन गुंड अॅड संग्राम तुपे अॅड नारायण गोले दत्ता प्रभाळे भीमराव कुटे अशोक रोडे प्रवीण गवते ज्ञानेश्वर गवते सुमीत वागमारे यांनी निवेदनात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे,

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.