Press "Enter" to skip to content

साधूंची हत्या करणार्‍या धर्मांधांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा !

हे साधूंवरील नव्हे, भगव्यावरील आणि हिंदु धर्मावरील आक्रमण ! – हिंदु जनजागृती समिती

सिटी बेल लाइव्ह / मुंबई #

अब्दुलापूर बाजार (मेरठ, उत्तर प्रदेश) येथील एका शिव मंदिराच्या कमिटीचे उपाध्यक्ष आणि पुजारी म्हणूनही कार्यरत असणार्‍या कांती प्रसाद या साधूंची धर्मांध मुसलमान युवकांनी दिवसाढवळ्या हत्या केली. या हत्येचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते. साधू कांतीप्रसाद यांनी भगवे वस्त्र घातले, म्हणून अनस कुरैशी या धर्मांधाने त्यांची छेड काढली आणि त्याचा विरोध केला, म्हणून या धर्मांधाने बेदम मारहाण करत साधूंची हत्या केली. यातून हिंदुबहुल भारतात भगवे वस्र घालणार्‍यांना हेतूतः लक्ष्य केले जात आहे, हे लक्षात येते. हे साधूंवरील आक्रमण नसून भगव्यावरील आक्रमण आहेे, हिंदु धर्मावरील आक्रमण आहे, असे आम्ही मानतो. यातून धर्मांधांचा हिंदुद्वेष आणि भगव्याचा द्वेषच दिसून येतो. अनस कुरैशी याला अटक झाली असली, तरी त्याच्यावरील खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवून त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि या घटनेमागे हेतूतः धार्मिक कलह निर्माण करण्याचा डाव तर नाही ना, याचाही शोध घ्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.

आधी पालघर, बुलंदशहर, नांदेड आणि आता मेरठ येथे साधूंचे हत्यासत्र चालूच आहे. या घटनांमुळे हिंदु समाजामध्ये संतापाची भावना आहे. ही घटना एखाद्या मुसलमान किंवा अन्य समाजातील व्यक्तीबाबत घडली असती, तर आतापर्यंत धर्मनिरपेक्षतावाद्यांनी ‘मॉब लिंचिंग’ म्हणत देश डोक्यावर घेत हिंदुत्वाला बदनाम केले असते; मात्र मृत हिंदु साधू आणि मारणारा मुसलमान आहे, म्हणून अद्याप एकाही पुरोगामी नेत्याने याचा साधा निषेधही केला नाही. हा भारतातील धर्मनिरपेक्षतेचा पराभव आहे. उत्तर प्रदेशचे मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी साधूंच्या हत्येचे धागेदोरे शोधून हिंदूंना न्याय देतील, अशी आम्हाला आशा आहे, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.