Press "Enter" to skip to content

अंगण

कैफात सुवासाच्या
अंगण वेडावले
सुवास चांदण्यांचे
रातराणीस कळले॥

ठायीच उभा प्राजक्त

फुलांसवे मोहरला

वेल मांडवी जाईचा
मोग-यास बिलगला

देखून सोनटक्का
शहारली सायली
निशिगंधास घे म्हणे
रंग माझा अबोली॥

गंधमुग्ध सोनचाफा

पानाआड दडला

रवीकिरणांचा अंगणी

सोनप्रकाश सुवासला॥

वृंदावनी तुळस मंजिरी
सखी राधा कृष्णाची
निरांजनी दीपज्योती
अंगणी प्रभात साजिरी॥

डॉ. अंजली टकले, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.