Press "Enter" to skip to content

महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने

कंगना घर तोडीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

मुंबई | मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगणा राणावतच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. कंगणा राणावतविरोधात महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

महापालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर त्याविरोधात कंगणाने उच्च न्यालालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. कंगणाचं पाडकाम हायकोर्टाने अवैध ठरवलं असून बीएमसीला यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

कंगणाची वास्तू नवी नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर आहे. महापालिकेने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.

हायकोर्टाने निरीक्षकाची नियुक्ती केली असून ते कंगणाच्या ऑफिसच्या पाडकामामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेणार आहेत. उखाड दिया असे म्हणत कंगना च्या बंगल्यावरील कारवाई करणे शिवसेनेला महाग पडले आहे.राज्याची सूत्रे सांभाळण्याचे बाजूला ठेऊन नको त्या गोष्टीत नाक खुपसत बसणे शिवसेनेस जड जाईल,या बाबतीत महाविकास आघाडी काय भूमिका घेते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.