Press "Enter" to skip to content

लेकुरवाळी

लेकुरवाळी

माया तुजवर, अशीच घुंगुरवाळी ।
मुक्त उमटते, शब्दांतुन रांगोळी ॥

ऐसे गहिरे, कुठेच नसती छंद ।
त्या गर्भातच, मायेचे होते बंध ॥

घरट्यात परतले, धुंद बावरे पक्षी
ही लेकुरवाळी, दोन हातांची कुक्षी ॥

येवून स्पर्शते जशी, दुधाला साय ।
तू तशी मला मी, तुझ्यात मिसळुन जाय ॥

केदार जोशी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.