Press "Enter" to skip to content

कोलाड हद्दीत बेवारस इसमाचा आढळला मुत्यु देह ; घातपात की अपघात ? 

कोलाड नाक्यात उलट सुलट  चर्चेला उधाण 🔷🔷🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । 🔶🔷🔶🔷

 कोलाड येथील आंबेवाडी नाका हद्दीत अंदाजे ४० ते ४५ वयाचा अनोळखी बेवारस पुरुष इसमाचा मुतदेह आढळून आला.यामुळे सबंध परिसरात खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान या मृतदेहाबाबत अपघात की घातपात अशी साशंकता निर्माण झाल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चा झाल्याचे ऐकायला मिळाले.

    मिळालेल्या अधिक माहिती नुसार ,मौजे आंबेवाडी गावचे हद्दीत कोलाड नाका येथे दि.२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एक ४०ते ४५ वर्षीय बेवारस अनोळखी पुरुष ईसमाचा मुत्यू देह आढळून आला होता.त्यामुळे हा इसम कोण आहे, येथे कशाला आला होता, हा अपघात आहे की घातपात अशी उलट सुलट चर्चा नाक्यात होती.परंतु हा इसम बेवारस असून त्याचा मुत्यु कोणत्या तरी आजाराने झाला असावा अशी माहिती कोलाड पोलिसांनी दिली आहे.तरी या बेवारस इसमाचे कोणी नातेवाईक असल्यास त्यानी कोलाड पोलिस स्टेशन मध्ये संपर्क साधावा असे आहवान कोलाड पोलिसांनी केले असून,

            या घटनेची नोंद कोलाड पोलिसात  आकसमीत मृत्यु अशी करण्यात आली असून या पुढील तपास कोलाड सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एन.आर पाटील करीत आहेत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.