Press "Enter" to skip to content

माथेरान चे बीएसएनएल मरणासन्न अवस्थेत

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे । 🔷🔷🔶🔶

माथेरान पर्यटन नगरीला दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणारे बीएसएनएल चे कार्यालय ओसाड पडले असून जेव्हाही येथे दूरध्वनी बंद पडल्याची तक्रार नोंदविण्यास गेल्यास टाळे लागल्याचेच पहावयास मिळते .

माथेरान मध्ये मागील वर्षांपासून दूरध्वनी सेवा कोलमडली असून येथे असलेले दूरध्वनी कार्यालय असून नसल्यासारखेच आहे एकावेळी येथे सहाशेच्यावर फोन जोडण्या होत्या पण आता त्या पन्नास वर येऊन ठेपल्या आहेत कार्यालयात कोणीही अधिकारी उपलब्द नसून कर्मचारीही अपवादानेच नजरेस पडत असतात दूरध्वनी बंद पडल्यानंतर ते पुन्हा कधी सुरू होतील ह्याची शाश्वती नसल्याने माथेरांकरांनी बीएसएनएल कडे कानाडोळा केला असून खाजगी सेवा देणाऱ्या सेवांकडे कल वाढू लागला आहे.

मोबाईल सेवा देणारा टॉवर ही वारंवार बंद पडत असल्याने इंटरनेट सेवा व ऑनलाईन बँकिंग चे तीनतेरा वाजले आहेत त्याचा सर्वात मोठा फटका येथील एकमेव बँक असलेल्या युनियन बँकेच्या सेवेला पडत असून त्यामुळे येथील एटीएम सेवा व बँकिंग सेवा नेहमीच कोलमडत असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे .

माथेरान मधील हे कार्यालय फक्त नावालाच उरले असून सर्वत्र जंगली वनस्पतींचे साम्राज्य पसरले आहे खाजगिकरणासाठी जाणूनबुजून शासन ह्याकडे लक्ष देत नसून हे खातेच शासनाला बंद करायचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याने माथेरांकरांना सेवाच मिळत नाझल्याचे चित्र येथे दिसत आहे अपुरी कर्मचारी संख्या ,डबघाईला आलेले कार्यालय, आवश्यक ती सामुग्री उपलब्द न झाल्याने बंद पडू लावलेले दूरध्वनी ह्या सर्व गोष्टींना दुजोरा देत असून त्याचा फटका मात्र माथेरांकरांना सोसावा लागत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.