Press "Enter" to skip to content

विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचेकडून चौकशीचे आदेश जारी

“जे नाही ललाटी,ते करी तलाठी” माहितीअधिकारात रोह्यातील भ्रष्ट तलाठ्याचे कारनामे उघड 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । रोहा । समीर बामुगडे । 🔷🔷🔶🔶

मौजे भुवनेश्वर तालुका रोहा जिल्हा रायगड स,नंबर 18 /अ सर्वे नंबर 38/ मिळकती पुरोगामी हक्कदार श्री चंद्रकांत सखाराम चव्हाण यांनी अप्पर तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण रोहा यांचे दिनांक 28 /5/ 1961 चे आदेशान्वये कुळ कायदा कलम 32 ग तरतुदीनुसार खरेदी केली. त्यानुसार त्यांचे नाव 32म खरेदी प्रमाणपत्र निर्गमित केले .अशी वस्तुस्थिती असताना सन 2012 मध्ये तत्कालीन कार्यरत तलाठी श्री. राऊत यांनी तहसीलदार रोहा यांचेकडील दिनांक2/6/ 2012 चे पत्रासंदर्भात दिनांक 25/ 6/ 2012 रोजी वर कथित मिळकती या मुळ सखाराम चव्हाण अभिलेखात नावे दाखल होत्या. त्यांचे मृत्यूपश्चात वारसांची नावे वारस म्हणून अभिलेखात दाखल झाली.

सद्यस्थिती आज रोजी कायम आहे, कायद्याने मृत व्यक्तीशी हातमिळवणी व संगणमत करून आपले फायद्यासाठी धादांत खोटा बेकायदेशीर अहवाल तहसीलदार रोहा यांच्याकडे सादर केला. त्या अहवालाची माहिती मिळताच अहवाला विरुद्ध तहसीलदार व उपविभागीय अधिकारी रोहा यांचेकडे दिनांक 15/ 12 /2016 रोजी तक्रार दाखल करून तलाठी यांनी दिलेल्या खोट्या बेकायदेशीर अहवालाची अभिलेख तपासणी व सखोल चौकशी करून दोषी तलाठ्यावर नियमोचित कारवाई करावी अशी दाद मागितली होती. परंतु संबंधित महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून कोणतीही चौकशी व कारवाई झालेली आली नाही .या संदर्भात उत्तर देण्यात आले नाही.

माहिती अधिकारात तलाठी यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने माहिती मागितली. जनमाहिती अधिकारी तथा मंडळ अधिकारी रोहा यांनी तलाठी यांचे भ्रष्ट कारभाराची पाठराखण करून खोटी माहिती पुरवली .माहिती अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 19 (1) नुसार अपिलीय अधिकारी तथा तहसिलदार यांचेकडे अपील दाखल करण्यात आले. अपील सुनावणी मध्ये अपिलीय अधिकारी आणि तलाठी कार्यालयाकडील अभिलेख तपासणी केली असता तलाठी कार्यालयाकडून माहिती अधिकारात देण्यात आलेले माहिती खोटी दिल्याचे उघड झाले .

माहिती अधिकारी तथा मंडळ अधिकारी यांनी आपीला मध्ये खोटी माहिती दिल्याचे मान्य करून आपिलार्थीस पत्र दिले की भुवनेश्वर येथील सर्वे नंबर 18/अ व सर्वे नंबर 38 /1अ ची चौकशी केली असता श्री. सखाराम चव्हाण नावे सातबारा उतारा अगर फेरफार नोंद झाल्याची दिसून येत नाही तसा तलाठी दाखला सोबत जोडला आहे.

याप्रकरणी मा. उपविभागीय आयुक्त कोकण यांचेकडे दिनांक 6 /2 /2019 रोजी तक्रार दाखल करून दाद मागितली. माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी तक्रार अर्जाची दखल घेऊन अर्ज दिनांक 19 /3 /2019 रोजी तहसीलदार रोहा यांचेकडे सखोल चौकशी करून आवश्यक अभिलेखांची पडताळणी करून तातडीने नियमोचित कारवाई करण्याचे आदेश दिले असता तहसीलदार रोहा यांचेकडून अद्याप पर्यंत अर्जकामी चौकशी करून आवश्यक अभिलेखाचे पडताळणी तसेच तातडीने नियमोचित कारवाई करण्याचे टाळले आहे .

तहसीलदार रोहा यांनी तलाठ्याच्या भ्रष्ट कारभारास पाठिंबा देऊन भ्रष्ट कारभाराची पाठराखण करून माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.

विशेष आश्चर्याची बाब म्हणजे या भ्रष्टाचारी तलाठ्यास दरम्यानच्या काळात प्रशासनाकडून उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
आदर्श नगर भुवनेश्वर रोहा येथील रहिवासी तथा माहिती अधिकार कार्यकर्ता श्री. विजय चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदर माहिती उघड केली आहे.

रोहा तहसिलदार कार्यालयाला जमीन दलालांचा विळखा पडलेला दिसत आहेत.एकिकडे लहान-सहान कामांसाठी जनतेला हेलपाटे घालावे लागत आहेत तर दुसरीकडे महसुल शाखेत जमीनदलाल कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून आपली कामे झटपट करुन घेत असल्याचे विदारक चित्र रोहा तहसिल कार्यालयात नित्याचेच झाले आहे .अशा परिस्थितीत राऊत सारख्या भ्रष्ट तलाठ्यावर वरिष्ठांच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्याबद्दल आश्चर्य वाटायला नको.तथापि रोहा तहसिलची महती सर्वदुर पोहचायच्या आगोदर भ्रष्ट कर्मचाऱ्यांना सांभाळून घेण्याचे उद्योग बंद करुन दिव्या खालचा अंधार उघड्या डोळ्यांनी तहसिलदारांनी पहावा अशी अपेक्षा सुज्ञ रोहेकर व्यक्त करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.