Press "Enter" to skip to content

“बयो” ला लागला पक्षीप्रेमी नागवेकर कुटंबियांचा लळा !

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । 🔷🔷🔶🔶

माणसा माणसामधील परोपकाराची व प्रेमाची ओढ कमी होत चालली असताना मात्र घार या पक्षाने आपल्यावर केलेल्या उपकाराची आजही जाण ठेवली असल्याची प्रचीती पक्षीमित्र राजेश नागवेकर यांना आली आहे.

काही वर्षांपूर्वी घार जखमी अवस्थेत पक्षीप्रेमी राजेश नागवेकर यांना आढळला होता. त्यांनी घरी नेऊन तिच्यावर उपचार केले. दोन महिन्यात बरी झाल्यानंतर तीने आकाशात भरारी घेतली होती. यादरम्यान राजेश नागवेकर यांच्या पत्नीने या घारीला “बयो” असे नामकरण केलं होतं.

त्यानंतर, सुमारे वर्षभरानंतर राजेश यांना आणखी एक घार जखमी अवस्थेत आढळली आणि त्यांनी वनविभागाला कळविले आणि तिच्यावर उपचार केले. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून ही घार आकाशात भरारी घेऊ शकली नाही. याचदरम्यान अडीच वर्षानंतर ‘बयो’ पुन्हा राजेश नागवेकर यांच्या घराच्या घिरट्या घालू लागली आहे.

यामुळे राजेश यांच्या शेजारी राहणारी बच्चेकंपनी सुद्धा ती दिसली की तिला हाक मारत असतात. यावेळी मात्र “बयो” नित्यनियमाने घडाळ्याच्या काट्यानुसार अगदी वेळेत येते. सकाळी सात आणि दुपारी चारच्या दरम्यान खायला येऊन घिरट्या मारत असल्याचे राजेश यांनी सांगितले आहे. यामुळे, शाळेला सुट्टी असलेली बच्चेकंपनी सुद्धा खाण्यासाठी तिची लगबग पहायला गर्दी करत असतात.या सगळ्यामध्ये राजेश यांच्या घरी कधी मांजर किंवा एखादा छोट कुत्र्याचं पिल्लू देखील पाळण्यात आलं नव्हतं , पण आज त्यांची मूल आणि पत्नी यांची बयोला खायला देण्यासाठी धावपळ सुरू असते.

यावेळी, “बयो” ही घरासमोरच्या पत्र्यावर येऊन बसते आणि चिकनचा तुकडा खायला हात पुढे करताच उडत येऊन आपलं खाद्य हातातून टिपून निघून जात असल्याचे राजेश यांची पत्नी सायली यांनी सांगितले आहे. “बयो” चा हा खेळ किमान अर्धा ते पाऊण तास सुरू असतो आणि पुन्हा ती आकाशात भरारी घेऊन निघून जाते.

यामुळे, गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला हा खेळ आसपासच्या रहिवाशांसाठी आकर्षणाचा विषय बनला आहे.तर , अडीच वर्षांपूर्वी आकाशात भरारी घेऊन निघून गेलेली घार पुन्हा दारात येऊ लागल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावरून माणसा माणसामधील परोपकाराची व प्रेमाची भावना कमी झाली असली तरी पक्षी प्राण्यांच्यात ती आजही घारीच्या अडीच वर्षानंतर परत येण्याने दिसून आली आहे. हे उरणमध्ये आज कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.