Press "Enter" to skip to content

सरकारने वीज देयकात जिझिया कर लावून जनतेची केली लूट

कर्जत प्रांत कार्यालयावर मनसेचा “दे धडक, बे धडक” मोर्चा ! 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव -कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔷🔶🔶

कोरोना काळात वीज दरांत वाढ करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळत या सरकारने परकीय राजवटीत जसा जिझिया कर लावतात तसा वीज देयकात जिझिया कर लावून जनतेची लूट चालविली आहे , ही मनमानी आत्ता खपवून घेतली जाणार नाही , म्हणूनच “असहकार पुकारा ” व वीज बिले कुणीच भरू नका , असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा मा. मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत आज रस्त्यावर उतरून राज्यभर वाढीव वीज बिल विरोधात मोर्चे काढून आंदोलन केले .

मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हाअध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज कर्जत तालुक्यात प्रांत कार्यालयावर “दे धडक , बे धडक ” मोर्चा काढून मा. राजसाहेब ठाकरे यांच्या सहीचे पत्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी प्रांतअधिकारी वैशाली परदेशी यांच्याकडे देण्यात आले .

यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष जे.पी.पाटील,रायगड जिल्हा सचिव प्रवीण गांगल ,खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्नुक,खालापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा हेमाताई चिंबुलकर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनविसे अभिषेक दर्गे, खालापूर तालुका सचिव अभिजित घरत,कर्जत तालुका सचिव प्रदीप पाटील,कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण,खालापूर तालुका उपाध्यक्ष आशिष चौधरी,कर्जत तालुका उपाध्यक्ष प्रवीण बोराडे,खालापूर शहर सचिव सतीश येरूणकर,खालापूर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष अविनाश देशमुख,तसेच ईतर पदाधिकारी मनसे सैनिक व महिला उपस्थित होत्या .

कोरोना महामारीचा एप्रिल महिन्यापासून कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे रोजगार अभावी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले . व्यवसायांना घरघर लागली , अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या , एका बाजूला कोरोना महामारीची भीती , तर दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण , या चक्रात भरडलेल्या जनतेला दिलासा देण्याचे सोडून महाआघाडी सरकारने वीज बिलांत प्रचंड वाढ करून ” शॉक ” देण्याचे काम केले . दुकाने , ऑफिसे बंद असताना ” अव्वा च्या सव्वा ” बिले देण्यात आली . जणूकाही परकीय राजवट असल्यासारखी जिझिया कर लावून नागरिकांची लूट चालविली आहे .

याबाबत मा.राज्यपाल , ऊर्जामंत्री यांना स्वतः राजसाहेब भेटून कोरोना काळात जनतेच्या भावनांशी खेळू नका , असे सांगूनही , हे कोणीच ऐकायला तयार नाहीत . शंभर युनिटपर्यंत वीज बिलांत सवलत सूट देऊ असे आश्वासन देणारे ऊर्जामंत्री यांनी देखील आता घुमजाव केल्याचे , पत्रात राजसाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे .

आत्ता जनतेचा संयम संपला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे , असा विश्वास दाखवून “असहकार पुकारा ” कुणीच विजबिले भरू नका , असे आवाहन जनतेला मा. राजसाहेब ठाकरे यांनी केले आहे . वीज कंपनीने वीज जोडणी तोडली तर मनसे सैनिकांबरोबर त्यांचा संघर्ष होईल , असा ईशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे . म्हणूनच सरकारने समंजस भूमिका घेऊन वाढीव वीज बिले माफ करून जनतेला दिलासा द्यावा , असे आवाहन मा . राजसाहेब ठाकरे यांनी पत्राद्वारे सरकारला केले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.