Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेस च्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष पदी आप्पा शिंदे

सिटी बेल / कल्याण.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण- डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष पदी जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी वंडार पाटील यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कल्याण-डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी पदी जेष्ठ आणि अनुभवी नेते जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी वंडार पाटील आज नियुक्ती करण्यात आली. प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयात प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

मागील काही महिन्यापासुन कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचा विषय प्रलंबित होता. अनेक पदाधिकारी या पदासाठी इच्छुक होते. याबबत दिवाळी पूर्वी निरीक्षक आणि राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे व माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी कल्याण येथे येऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या व तसा अहवाल प्रदेश कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार आज हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

आप्पा शिंदे हे वैद्यकीय क्षेत्रात मागील चाळीस वर्षापासून कार्यरत असून, ते आठ वेळा राज्य संघटनेच्या अधाक्षपदी निवडून आलेले आहेत. तसेच अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचेही ते सुमारे १८ वर्षापासून नेतृत्व करत आहेत. त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखूनच शरद पवार यांनी त्यांना २०१४ साली विधान परिषदेची आमदारकी दिलेली होती. सन २००५ मध्ये आप्पांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पहिला महापौर विराजमान झालेला होता. श्री. जगन्नाथ आप्पा शिंदे यांची संघटनात्मक कामगिरी व सहा वर्षाच्या आमदार पदाच्या कार्यकाळातील प्रशासकीय अनुभव याचा लाभ नक्कीच त्यांच्या नवीन पदाच्या कामात होईल. त्याचप्रमाणे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हनून परिचित असलेल्या जगन्नाथ आप्पा शिंदे यांचे संघटनेतील वरिष्ठांशी पहिल्यापसून सौहार्दाचे संबंध असल्याने त्याचा फायदा नक्कीच कल्याण-डोंबिवली शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला होईल,

श्री वंडार पाटील हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी कार्यरत राहिले असल्याने त्यांचाही संघटना व प्रशासकीय अनुभव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून, पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपविली असल्याने पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळाले अशी आशा पल्लवित झालेली असून, पक्षाने निष्ठावंतांचा सन्मान केल्याची भावना निर्माण झालेली आहे.

कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेच्या आलेल्या निवडणुका व त्यावेळी जगन्नाथ आप्पा शिंदे व वंडार पाटील यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी सोपविलेली जबाबदारी अतिशय महत्वपूर्ण समजण्यात येत असून, त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.