Press "Enter" to skip to content

शिवसेना खासदार – आमदारांत का रे दुरावा…

शिवसेनेच्या “या” खासदार आणि आमदारांमध्ये विस्तव जात नसल्याची चर्चा 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । विकी भालेराव । 🔶🔶🔷🔷

मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे व कर्जत खालापूर चे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यामधील परस्पर विरोधी भूमिका असल्याने खालापूर कर्जत मधील शिवसैनिक मात्र या दोघांच्या संबधातील अंतराने शिवसैनिकांना आपण कोणाबरोबर जायचं या संभ्रमात असतात.

शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा बाण सोडून शेकाप पक्षाचा खटारा हातात घेतला होता. उपजिल्हाप्रमुख असणार्या महेंद्र थोरवे यांना ऐन वेळेस शिवसेनेने तिकीट नाकारल्याने दोन तासात शेकाप पक्षाचा विधानसभेचे तिकीट घेऊन तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यावेळी लाड आणि शेकाप पक्षाचे महेंद्र थोरवे यांच्यामध्ये फक्त १४०० मताचा फरक राहिला होता तर शिवसेनेचे उमेदवार तब्बल पंधरा हजाराच्या मता ने पिछाडीवर होता त्यावेळेस झालेला थोड्या मताचा पराभवास विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच जबाबदार असून बारणे यांनी तिकीट कापल्याने शेकाप पक्षात गेलेल्या महेंद्र थोरवे यांना पराभव स्वीकारावा लागल्याची सळ टोचत होती.

मात्र २०१९ च्या निवडणुकीत शेकाप ला काडीमोड देत थोरवे यांनी शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा तिकीट मिळवले आणि विधानसभेत प्रवेश केला मात्र शिवसेनेचे खासदार बारणे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील कटुता मात्र काही कमी झाली नव्हती. ती दरी अजून वाढत जात खासदार आणि आमदार हे कुठेच एकाच कार्यक्रमात एकत्र दिसले नाहीत.

जूनमध्ये झालेल्या चक्रिवादळवाऱ्या च्यावेळेस खासदारांचा दौरा केला तर आमदारांनी स्वतंत्र दौरा केला होता तर सध्याच्या अतिवृष्टीमुळे खासदार श्रीरंग बारणे बारणे यांनी खालापुरातील शेतीच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी आमदारांनी पाहणी दौरा खासदारांच्या दौर्‍याच्या वेळेस काही मोजकेच कार्यकर्ते असल्याचे समोर आले होते तर आमदाराच्या दौर्‍याच्या वेळेस तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख शिवसेनेचे अनेक पदाधिकारी ते खोपोलीतील ढेकू औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या कंपनीतील स्फोटांमध्ये या दौऱ्याचा पुन्हा प्रत्यय आला आणि आमदारांनी आदल्या दिवशी घटनास्थळी दाखल होऊन काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सुचना केल्या होत्या.

तर खासदार श्रीरंग बारणे यांनी दुसर्‍या दिवशी येत कंपनीच्या घटनास्थळी जात पाहणी केली येथे वेळ सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबत सांगितल्याचे एका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले मात्र प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्ता जो आमदार महेंद्र थोरवे यांच्या बरोबर आहे त्यांनी आपण बाहेर असल्याचे सांगितले तर काही फोन न उचलण्याचा तसदी घेतली खासदारांच्या दौऱ्यात शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत देशमुख माजी उपसभापती जनार्दन थोरवे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या सामावेश होता.

याबाबत एका कार्यकर्त्याला विचारणा केली असता सांगितले की, खासदार तालुक्यात येत असताना आम्हाला कुठलीही सूचना देत नाहीत तर आमदार थोरवे शिवसेनेच्या पदाधिकारी बरोबर घेत असल्याचे सांगितले खासदारांनी एक खोटा आरोप तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांवर केल्याचा या कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रावणाचे गर्वहरण झाले तसेच इथली परिस्थिती असून मी मोठा की तु मोठा करीत असल्याने कर्जत खालापूर मध्येही एका दिवशी गर्वहरण होईल तेव्हाच येथील लोकप्रतिनिधींना जाग येईल का असा सवाल करीत शिवसैनिकांनी कोणाच्या बरोबर जायचे व कोणाचे बरोबर जायचे नाही अशा संभ्रमात असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.