Press "Enter" to skip to content

उरण शहरातील खासगी क्लास बंद ठेवण्याचे उनपाचे आदेश

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔷🔶🔶

राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व शैक्षणिक संस्था व खासगी क्लास बंद ठेवण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त असूनही उरण शहरात खासगी क्लास सुरू आहेत. ते त्वरित बंद करावेत अन्यथा कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष साळवी यांनी दिला आहे. यामुळे खासगी क्लास चालकांचे धाबे दणाणले आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाने हाहाःकार माजविला आहे. त्याला ८ ते ९ महिन्याचा अवधी उलटूनही प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शाळा बंद असल्यातरी खासगी क्लास मात्र सुसाट असल्याचे चित्र पहावयास मिळते. त्याठिकाणी सोशल डिस्टंचा पालन होताना दिसत नाही. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये यासाठी उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष साळवी यांनी शहरात सुरू असलेले खासगी क्लास बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एकदंत अपार्टमेंट मधील स्वामी विवेकानंद क्लासेसच्या नावाचा उल्लेख करून हे क्लास सुरू असल्याचे सांगून ही बाब गंभीर असून शासन आदेशास बाधा पोहचविणारा आहे. तरी सदर पत्र हे २४ नोव्हेंबर रोजी दिले आहे. या पत्राची दखल घेऊन क्लासेस त्वरित बंद करावेत अन्यथा नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

याचबरोबर शहरात इतर अनेक ठिकाणी खासगी क्लास कोणतेही नियम न पाळता मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.