Press "Enter" to skip to content

संजय होळकर छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय सन्मान 2020 पुरस्काराचे मानकरी

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔶🔶🔷🔷

श्री अमरदिप पंढरीनाथ मखामले (उर्फ दादासाहेब ) ,कवी शायर गीतकार लेखक यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे ऑनलाईन स्पर्धा भरवून स्पर्धकांना ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.

जगभरातील 26 देशाने सहभाग घेतला होता एकूण 1 हजार 823 स्पर्धेकांनी यात सहभाग नोंदवला होता साधारण 3 महीन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती मराठी साहित्यिक, कवी, लेखक, चिञकार, दिग्दर्शक, कथाकार, कवी लावणी नृत्य, विनोद, काव्याचे व साहित्याचे सर्व प्रकार तसेच लाईव्ह सादरीकरणाची संधी साहित्यिकांना स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. तसेच एकाच वेळेस साहित्यिकांना आपले सादरीकरण विदेशापर्यत पोहोचविण्याचे व मराठी साहित्याचा प्रवास व मराठी भाषेतील कला गूणांचा झेंडा या स्पर्धेच्या उपक्रमातून अटकेपार रोवला गेला.

सर्व साहित्यिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे महान कार्य अमरदिप पंढरीनाथ मखामले (उर्फ दादासाहेब )यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केले.त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई ता.उरण येथे कार्यरत असणारे शिक्षक संजय जयराम होळकर यांनी आपले स्वरचित साहित्यिक व कला तसेच झूम मुलाखतीद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर सादरीकरण केले होते त्या करिता त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील “छंदगोमात्य संमेलन मनस्पर्शी मानकरी” तसेच “छंदोगामात्य साहित्य साधक मानकरी” असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष दोन पुरस्कारांनी संजय होळकर गुरुजी यांना आंतरराष्ट्रीय सन्मान 2020 समूहाकडून सन्मानित करण्यात आले आहे .

हा सन्मान शिक्षक संजय होळकर यांना मिळाल्याने त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि सर्व सामाजिक शैक्षणिक स्तरातील मान्यवरांकडून तसेच विविध सामाजिक संघटना व शिक्षक बंधू, भगिनींकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

One Comment

  1. Amardeep Pandharinath Makhamale (Dadasaheb) Amardeep Pandharinath Makhamale (Dadasaheb) November 26, 2020

    Great Publicity

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.