Press "Enter" to skip to content

अंबा नदीतील काँक्रिटचा अडथळा दूर : विसर्जन होणार सुरळीत

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔶🔶

नागोठण्यातील अंबा नदीतील ऐतिहासिक पुलाच्या खाली टाकण्यात आलेले परंतू नंतर फुटून इतरत्र पसरलेले सिमेंट काँक्रिट ग्रामपंचायतीकडून नुकतेच काॅम्प्रेसरच्या सहाय्याने फोडण्यात आले. जुन्या पुलाला कोणताही धोका न पोहचविता गणेश विसर्जन स्थळी दरवर्षी अडथळा ठरणारे हे सिमेंट काँक्रिट काढण्यात आल्याने व पुढील वर्षापासून विसर्जन सुरळीत होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नागोठण्यातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या येथील अंबा नदीतील सुमारे पाचशे वर्षांपूर्वीच्या पुलाच्या डागडुजीच्या कामासाठी काही वर्षापूर्वी पुलाच्या पायथ्याशी सिमेंट काँक्रीट करण्यात आले होते. मात्र कालांतराने हे काँक्रीट फुटल्याने ते नदीच्या पात्रात पसरले होते व त्यामधील पोलादी सळ्या बाहेर आल्या होत्या.

अंबा नदीतील या ठिकाणीच नागोठण्यातील गणेशांचे विसर्जन होत असते. त्यामुळे या काँक्रीटमधून बाहेर आलेल्या सळ्या गणेश विसर्जनासाठी नदीत जाणाऱ्या नागरिकांना लागण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. मात्र आता ग्रामपंचायतीने हा फुटलेला सिमेंट काँक्रीट काॅम्प्रेसरच्या सहाय्याने पूर्ण फोडून विसर्जन स्थळावरील अडथळा दूर केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.