Press "Enter" to skip to content

मालमत्ता कराबाबत कामोठे वासियांना चंद्रशेखर प्रभू यांचे मार्गदर्शन

मालमत्ता कराबाबत कामोठे वासियांना चंद्रशेखर प्रभू यांचे मार्गदर्शन

        सध्या पनवेल पालिकेकडून, मालमत्ता कर भरण्यासंबंधी, सर्वांना नोटीस आलेली आहे. तसेच हरकती व सूचनांची पत्रे पाठविल्यानंतर, सुनावणीसाठी वैयक्तिकरित्या बोलावले जात आहे. त्यासाठी तज्ञ व्यक्तिंचा सल्ला म्हणून कामोठे वासियांना नगरनियोजन तज्ञ  चंद्रशेखर प्रभू  यांना विचारणा केली.प्रभू यांनी झूम मीटिंग च्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले.
          नगरनियोजन तज्ञ श्री. चंद्रशेखर प्रभू यांनी काल झालेल्या  झूम मीटिंगमध्ये दुहेरी कर आकारणी बाबत  खालील मुद्दे सुचवले
१)सध्या कोरोनाची महामारी चालू आहे. त्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येत आहे. म्हणून जनतेने जबाबदारीने आणि काळजीने वागावे असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने जनसुनावणी घेणे हे जनतेवर अन्यायकारक आणि जनतेच्या जीवाला धोकादायक आहे. तरी ही जनसुनावणी कोरोनाची साथ आटोक्यात येईपर्यंत स्थगित करावी.
२) जशी एका गुन्ह्याला दोन शिक्षा दोन वेळा शिक्षा होऊ शकत नाही, तसेच एकाच प्रकारच्या सुविधांना दोन वेळा कर लावता येत नाही. आणि जी  संस्था, ज्या सुविधा सेवा पुरवते तिलाच तो कर लावायचा अधिकार असतो. त्यामुळे (आपल्या या बाबतीत) सिडकोने एकदा सर्विस चार्ज घेतल्यानंतर त्यावर महापालिकेला टॅक्स लावण्याचा  अधिकार नाही. असे हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी निर्देशीत केले आहे.
३)निरनिराळे कर, हे पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व सेवा यांच्याशी संबंधित असायला हवे. पुरेशा सुविधा न देता महापालिकेने मालमत्ता कर, फक्त कर लावायचा अधिकार आहे म्हणून तो लावणे हे गैर आहे.
४) जनतेला हॉस्पिटल, आरोग्य सेवा, परिवहन सेवा, पाणी इ. अनेक गोष्टी पुरविणे हे महापालिकेचे आद्यकर्तव्य आहे. पण हे न करता महापालिका आपला अधिकार दाखवून मालमत्ता कर लावते हे गैर आहे. प्रत्येक नागरिकाला त्याचे या बाबतील मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सध्याच्या कोरोना काळात आपले मत नोंदवणे शक्य नाही. त्यामुळे कोरोना काळात हा कर स्थगित करावा.
तसेच या महामारीच्या काळात, *’तुम्ही आता आपले म्हणणे मांडले नाही तर एकतर्फी निर्णय घेण्याची ताकीद देणे’*. हे एक प्रकारे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार ठरेलं.
       या मुद्द्यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेला पत्रे लिहून तूर्तास जनसुनावणी थांबण्यास भाग पाडण्याचा चंग कामोठे वासियांना बांधला आहे.

सिटिझन्स युनिटी फोरम कामोठे च्या अध्यक्षा रंजना सडोलीकर यांनी कोरोना ची दुसरी लाट उंबरठ्यावर असताना इतक्या मोठ्या स्वरूपात जनसुनावणी घेणे योग्य नसल्याचे म्हणत ही जनसुनावणी पुढे ढकलावी या स्वरूपाचे पत्र पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त देशमुख यांना दिले आहे.तसेच चंद्रशेखर प्रभू यांनी मार्गदर्शन केलेल्या मुद्यांचे अनुषंगानेआमदार प्रशांत ठाकूर व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांना देखील पत्र लिहिली आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.