Press "Enter" to skip to content

देवा ! बरे झाले

देवा ! बरे झाले

देवा ! बरे झाले ही महामारी आली
माणसाला माणुसकीची किंमत कळाली
जमीनजुमला बंगलगाडी संपत्ती या नसे अर्थ
जीवनाशिवाय आहे हे सारे व्यर्थ

देवा ! बरे झाले ही महामारी आली
पर्यावरणाची महती जगा कळू लागली
पर्यावरणावर जर कराल तुम्ही कुरघोडी
तर साधा व्हायरसही लावेल देशोधडी

देवा !बरे झाले ही महामारी आली
जगाला जिवलगांच्या संवादाची महती कळाली
कामाच्या रगाड्यात नव्हता वेळ बोलायला
आता धीराचे दोन शब्द देतात उभारी मनाला

देवा!बरे झाले ही महामारी आली
लग्नकार्यात भरमसाठ खर्चाची बचत झाली
पोकळ बडेजावाची फुशारकी लक्ष्यात आली
काळजाचा तुकडा विकायची नौबत नाही आली

देवा ! बरे झाले ही महामारी आली
देवळे मशिदी चर्च गुरुद्वारा बंद झाली
डॉकटर नर्स स्वछता दूत पोलीसामध्ये देवत्वाची प्रचिती आली
यांच्यापुढे आपोआपच आमची मस्तके लिन ती झाली

अहो ! या महामारीने चांगलाच धडा शिकवला
माणसाला माणुसकीचा धर्म लक्ष्यात आणून दिला
चांगल्या शोधांचा उपयोग मानव कल्याणासाठी करा
नाहीतर साधा व्हायरस जीवनाचे वाजवेल बारा

विलास चव्हाण, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.