Press "Enter" to skip to content

प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने सुसज्ज वाचनालय सुरु करावे

युवासेनेची पनवेल महानगरपालिकेकडे मागणी 🔷🔷🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔷🔶🔶🔷

मराठी पत्रकार, थोर समाजसुधारक, ज्वलंत विचारांचे वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रगण्य पुढारी, तत्कालीन अस्पृश्यता व हुंडाप्रश्न ह्या विषयांवर लढा देणारे आणि आपल्या कर्तुत्वाने समाजाचे प्रबोधन करणारे वंदनीय प्रबोधनकार म्हणजेच केशव सिताराम ठाकरे ह्यांचा जन्म ह्याच पनवेलच्या भूमीवर दिनांक १८ सप्टेंबर, १८८५ रोजी झाला होता…

ह्या महान राष्ट्रात प्रबोधनकारांचे एक विशिष्ट स्थान आहे… समाजाला निव्वळ प्रबोधनातुनच नव्हे तर आपल्या कृतीतून आदर्श घालून देणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती आहे… २२ हून अधिक साहित्यकृती, अनेक लोकोपयोगी चळवळी आणि महिलांच्या उद्धारासाठी केलेले अनेक संघर्ष अशा अनेक गोष्टींसाठी पुढील अनेक शतक वंदनीय प्रबोधनकार जनतेच्या स्मरणात राहतील.

अशा ह्या महान व्यक्तीमत्वांच्या नावाने महापालिकेच्या माध्यमातून एखाद सुसज्ज वाचनालय पनवेलमधे उभारण्यात आल्यास प्रबोधनकारांच्या अमूल्य विचारांसाठी ति खरी मानवंदना ठरेल अशी मागणी उप आयुक्त श्री. डाके ह्यांच्याकडे युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आली.

ह्यावेळी सोबत उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, उपविधानसभा अधिकारी सनी टेमघरे, उपविधानसभा अधिकारी निखिल दिघे, शहर अधिकारी निखिल भगत तसेच इतर युवासैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.