Press "Enter" to skip to content

रोहा प्रेस क्लबचे सचिव नंदकुमार मरवडे यांना मात्रुवियोग

सबंध पंचक्रोशी शोकाकुल 🔶🔶🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । 🔷🔷🔷🔷

रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी गावचे रहिवासी तथा रोहा प्रेस क्लबचे सचिव पत्रकार नंदकुमार मरवडे यांच्या मातोश्री शांतीबाई विठोबा मरवडे यांना नुकतीच वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली.निधनासमयी त्यांचे वय ८३ वर्षे होते.त्यांच्या निधनाने मरवडे कुटुंबीयांसह सबंध पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे.

         अतिशय प्रेमळ,सर्वांशी मिळून मिसळून वागणा-या तसेच सामाजिक कार्याची विशेष आवड असणाऱ्या शांतीबाई मरवडे या सर्व आप्तस्वकीय, मित्र परिवार यांच्यामध्ये विशेष प्रिय होत्या.वारकरी सांप्रदायाचे पाईक असल्याने आपल्या हयातीत त्यांनी अनेकवेळा आळंदी व पंढरपूर या पायी वा-या नित्यनियमाने केल्या होत्या. तर त्या अशिक्षित होत्या.परंतू शिक्षणाचे महत्त्व अधिक जाणून असल्याने त्यांनी अतिशय काबाडकष्ट करून आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले.

कुटुंबात शांत सय्यमि आणि प्रेमळ स्वभामुळे सर्वांनाच त्या खुप आवडत्या होत्या.आपल्या सुनांवर त्यांनी मूली सारखे प्रेम केले.पारंपारिक सणासुदित कार्यक्रमात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत असत.कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर त्यांचे आप्तस्वकीय व ग्रामस्थ यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

        त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवार २७ नोव्हें.तर उत्तर कार्य विधी सोमवार ३० नोव्हें रोजी तळवली येथील राहत्या निवासस्थानी करण्यात येणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.