Press "Enter" to skip to content

शिवा संघटनेचा कपिलधार मेळावा यंदा ऑनलाईन

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचा महत्वपूर्ण निर्णय 🔷🔷🔶🔶

सोशल व फिझिकल डिस्टंस पाळण्याचे शिवा संघटनेचे नागरिकांना, शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔷🔶🔶🔷

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान, प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्रीक्षेत्र कपिलधार येथे प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच दरवर्षी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा राज्यव्यापी भव्य दिव्य असा मेळावा भरत असतो.वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या शिवा संघटनेचा यंदा रौप्यमहोत्सवी 25 वा वार्षिक मेळावा व 19 वी शासकीय महापूजा याही वर्षी मोठया उत्साहात साजरी होणार आहे.

बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पदयात्रींना नागरिकांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. तसेच मंदिर परिसरात कोणतेही उत्सव साजरे करता येणार नाही.भाविकांनी घरात राहूनच सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे संत मन्मथ स्वामी यांचे दर्शन घ्यावे.मंदिर परिसरात भाविक भक्तांनी गर्दी करू नये, सोशल व फिसिकल डिस्टन्स पाळावे असे आदेश जारी केल्याने जिल्हाधिकारी यांचा आदेश पाळत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदाचा शिवा संघटनेचा वार्षिक मेळावा हा फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी सांगितले.

28 नोव्हेंबरला दुपारी 4.00 वाजता शासनाच्या बस मधून फोटोची पालखी घेऊन 50 पदाधिकारी व शिवाचार्य भक्ती स्थळ(अहमदपूर जिल्हा लातूर )येथून निघून 29 नोव्हेंबरला श्री क्षेत्र कपिलधार जिल्हा बीड येथे पोहोचून दुपारी 4.00 वाजता शासकीय महापूजा करून 4.30 वाजता शिवा संघटनेचा 25 वा रौप्यमहोत्सवी राज्यव्यापी मेळावा आणि 19 वी शासकीय महापूजा शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर “शिवा संघटना 5 कोटी वीरशैव-लिंगायत महात्मा बसवेश्वर प्रेमी “या फेसबुक ग्रुपवर फेसबुक लाईव्ह शिवा संघटनेचा मेळावा होणार आहे.

कोरोना माहामारीच्या संकटामुळे या वर्षी लाखो समाज बांधवांना प्रत्यक्ष हजर राहता येणार नसले तरी शिवा संघटनेचा वार्षिक मेळावा व शासकीय महापूजेचा कार्यक्रम असंख्य समाज बांधवांना घरबसल्या Facebook live वर पाहता येईल वीरशैव लिंगायत समाजाच्या शिवा संघटनेच्या अधिकृत प्रचंड मोठा फेसबुक गृप असलेल्या “शिवा संघटना 5 कोटी वीरशैव-लिंगायत महात्मा बसवेश्वर प्रेमी ” या फेसबुक गृप वर तो सर्वांना पाहायला मिळणार आहे. सर्व कार्यकर्ते, समाज बांधवांनी “शिवा संघटना 5 कोटी वीरशैव-लिंगायत महात्मा बसवेश्वर प्रेमी “या फेसबुक गृपला जाॅईन होऊन आप-आपल्या भागातील हजारो समाज बांधवांना ही invite करावे.व प्रतिवर्षी प्रमाणे रविवार दि.29 नोव्हेंबर 2020 रोजी 4.30 वाजता होणाऱ्या शिवा संघटनेच्या कपिलधार मेळाव्याचा live कार्यक्रम आपल्या मोबाईल वर पहावा असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी समाजबांधवांना केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.