Press "Enter" to skip to content

लॉकडाउनच्या संकटात तरुणांनी शोधली संधी

उरणच्या तरुणांनी बनवली बॅटरीवर चालणारी सायकल, एलईडी ट्यूब व क्लिनिक मशीन 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔶🔷

शिक्षणाचा योग्य वापर झाला की त्याच समाधान काही औरच असतं… त्यातच ते आपल्या मित्रासाठी उपयोगी पडलं तर खूप समाधान मिळत. याच मैत्रीसाठी रायगड जिल्ह्यातील उरणमधील तरुणांनी लॉकडाऊनचा फायदा उठवत
बाजारभावाच्या निम्म्या किमतीत बॅटरीवर चालणारी इ – सायकल तयार केली असून त्यासोबतच सोलारवर चालणारी रिव्हर क्लिनिंग मशीन आणि बॅकअप एलइडी ट्यूब तयार केली आहे.

गेल्या सात महिन्यांपेक्षा अधिक काळापासून राज्यात कोरोनाचा सावट आहे आणि या काळात अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आले होते. याचदरम्यान, रायगड जिल्ह्यातील उरण येथे राहणाऱ्या इंजिनीअरिंगच्या मित्रांनी आपल्या शिक्षणाचा वापर करीत बॅटरी आणि सोलारवर चालणारी उपकरण तयार केली आहेत. यामध्ये निमित्त ठरल ती म्हणजे मित्राला हवी असलेली बॅटरीवर चालणारी ‘इ- सायकल’. सुमारे ३५ ते ४० हजार रुपये बाजारभाव असलेली ‘इ- सायकल’ ही मित्राला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नव्हती म्हणून मित्रांनी स्वतःच इ- सायकल बनविण्याचा निश्चय केला. सुमारे तीन महिन्याचा प्रयत्नांनंतर श्रेयस, शुभम, प्रथमेश आणि त्यांच्या मित्रांनी आपल्या शैक्षणिक शिक्षणाचा वापर करून ‘इ- सायकल’ तयार केली आहे.

यावेळी, मित्रासाठी तयार केलेली ही सायकल अवघ्या दोन रुपयांच्या विजेमध्ये सुमारे २५ किलोमीटर अंतर पार करू शकते. तर, या सायकलचा वेग हा सुमारे ४० किलोमीटर पर्यंत पोहचू शकत असून या सायकलला ‘ओझॉन’ अस नाव देण्यात आलं असल्याचे श्रेयस वैवडे याने म्हटलं आहे.

तर, याच दरम्यान या मित्रांनी एखाद्या गरीबाच्या घरात प्रकाश आणण्यासाठी बॅकअप एलइडी – ट्यूब सुद्धा तयार केली आहे. यासाठी , अवघ्या मोबाईल चार्जरच्या मदतीने सुमारे सात तास वीज देणारी एलइडी ट्यूब तयार केली असल्याचे प्रथमेश भोईर याने सांगितले आहे .

त्याचबरोबर, सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या ओंकार औटी आणि त्याच्या मित्रांनी सोलार एनर्जीवर चालणारी ‘रिव्हर – क्लिनिंग’ मशीन तयार केली आहे. यासाठी, त्यांनी सोलार एनर्जीचा वापर केला असून या मशिनद्वारे नदीपात्र आणि तळ्यातील कचरा बाहेर काढणे सोपे होणार असल्याचे म्हटले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.