Press "Enter" to skip to content

महिला बचत गटांचे कर्जं माफ करण्याची मागणी

मनसेची जिल्हाधिकारी कार्यांलयावर धडक 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे 🔷🔶🔶🔷

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लादण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुले महिला बचत गटांच्या व्यवसायावर मोठा आर्थिक परिणाम झाला असून बॅंका व फायनान्स कंपन्यांकडून कर्जांचे हप्ते भरण्याचा तगादा लावण्यात येत आहे.त्यामुले आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिला बचत गटांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात मनसे आक्रमक झाली असून महिला बचत गटांचे कर्जं माफ करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.

लाॅकडाऊनचा मोठा फटका महिला बचत गटांना बसला असून लघु उद्योगावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.महिला बचत गटांनी तयार केलेला माल विकला गेला नसल्याने अनेक महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्योगासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरता येत नसताना बॅंका तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यां कर्जांचे हप्ते वसुलीसाठी बचत गटांच्या मागे हात धुवून लागल्या आहेत.व्यवसाय नसल्याने कर्जांचे हप्ते फेडायचे कसे. असा प्रश्न महिला बचत गटांपुढे उभा राहिला आहे.यासाठी महिला बचत गटांचे कर्जं माफ व्हावे यासाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.यावेली अलिबाग येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चांला सुरुवात करण्यात आली.

या मोर्चा मध्ये नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस शिरीष सावंत ,महिला आघाडी सरचिटणीस स्नेहल जाधव, सहकार सेना अध्यक्ष दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, अतुल भगत,जिल्हाउपाध्यक्ष महेश कुन्नुमल, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सपना देशमुख, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शालेय पेणकर, उपाध्यक्षा अनिषा माजगावकर, खालापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा हेमलता चिंबुलकर, तालुका सचिव अभिजित घरत, सचिन कर्णुंक, जिल्हा उपाध्यक्ष जे.पी.पाटील व अन्य पदाधिकारी,कार्यकर्तें व महिला बचत गटातील महिला उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.