Press "Enter" to skip to content

“मानसिकता, अगतीगता की शोकांतिका”

पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करा विरोधात आक्रमक होण्याची आवश्यकता – आत्माराम गावंड 🔷🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔷🔷🔶🔶

मालमत्ता कराला कडाडून विरोध करण्याची गरज असून त्यासाठी हरकती घेणे आवश्यक आहेत. हरकत अर्ज प्राप्त न झाल्यास मालमत्ता कर आकारणी आपणास मान्य आहे असे गृहीत धरून प्रस्तावित कर आकारणी करण्यात येईल असे पनवेल महानगरपालिकेच्या नोटिसमध्ये स्पष्ट नमूद असताना देखील सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनर्स संस्था ( असोसिएशन )आदी संस्थांचे पदाधिकारी केवळ प्रश्नावली तयार करण्यात व्यस्त आहेत.

 पब्लिसिटी स्टंट करून भागणार नाही, ठोस पावलं उचलावी लागतील अन्यथा राजकिय हस्तक्षेप अटळ आहे. सत्ताधारी पक्षाने मालमत्ता कर आकारणीची बंदूक आता प्रशासनाच्या खांद्यावर ठेवली आहे. अशा परिस्थितीत “लोहा लोहे को काटता है” या म्हणीप्रमाणे  पालिका प्रशासनाला त्यांच्याच भाषेत  उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी  पालिकेकडे  हरकती अर्जंचा खच पडाण्याची आवश्यकता आहे.  

लिटमस टेस्ट

पनवेल महानगरपालिकेने मालमत्ता कर आकारणीसाठी क-वार्ड ,प्रभाग क्रमांक:11,12, 13, 14 आणि ड-वार्ड ,प्रभाग क्रमांक: 17, 18, 19, 20, ची निवड केली आहे. ह्या प्रभागातील सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनर्स संस्था ( असोसिएशन ) या संस्थांचे पदाधिकारी यांनी विरोध केला नाही आणि मोहीम यशस्वी  झाल्यास अ-वार्ड , प्रभाग क्रमांक: 1, 2, 3, 4, 5, 6, आणि ब-वार्ड, प्रभाग क्रमांक: 7, 8, 9, 10, 15, 16, या वार्ड मध्ये नंतर नोटीस पाठविण्यात येणार आहे. अ आणि ब वार्ड मध्ये, खारघर, कळंबोली, खांदा वसाहत, नवीन पनवेल, तळोजा फेज १ व तळोजा फेज २ येथे नंतर नोटिसा पाठविण्यात येतील. त्यासाठी आपल्या शहराची जबाबदारी जास्त आहे, ह्याचे भान ठेवून प्रत्येकाने आपापल्या सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनर्स संस्था ( असोसिएशन ) या संस्थांच्या पदाधिकारी यांनी हरकत अर्ज पनवेल महापालिकेच्या त्या त्या वार्ड ऑफिस मध्ये जमा करावेत.

दिनांक 1/10/2019 ठराव,नंतर महानगरपालिका अधिनियम नुसार 15 (2)कर आकारणी साठी नोटीस देताना आपण त्या मध्ये मालकी हक्काचे पेपर सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनर्स संस्था (असोसिएशन) चे अध्यक्ष/सचिव यांनी दयावे या साठी ते बंधनकारक असतील असे नमूद केले आहे. या साठी सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनर्स संस्था (असोसिएशन) यांच्या अध्यक्ष/सचिव यांना जबाबदार न धरता, आपण या साठी सिडको वसाहत अधिकारी यांच्या कडून मालकी हक्काचे कागदपत्रे घेण्यात यावे. कारण सिडको हद्दीतील घर/दुकान च्या खरेदी विक्री करतांना सिडकोचे ना हरकत दाखला लागतो त्या मुळे हा विषय सरळ  सिडको विभागाशी निगडीत असतांना आपण सरळ मालकी हक्काचे पेपर सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनर्स संस्थाचे अध्यक्ष/सचिव यांनी सादर करावे असे नमूद केले ते सारासार चुकीचे आहे तसेच मालकी हक्काचे कागदपत्र हे सिडकोच्या वसाहत विभागाकडून आपण मागून घ्यावे. असे पनवेल महानगर पालिकेच्या  त्या वार्ड अधिकारी यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.