Press "Enter" to skip to content

रयत शिक्षण संस्थेत महेंद्र घरत यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

रयतच्या उच्च शिक्षण समितीवर महेंद्र घरत यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । सातारा । 🔷🔶🔶🔷

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बीजारोपण केलेली रयत शिक्षण संस्था एव्हाना राज्यभरात चांगलीच फोफावली आहे. अण्णांनी लावलेल्या या वटवृक्षाचा डेरा जोमाने बहरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घोडदौड सुरू आहे.अत्यंत सन्माननीय समजल्या जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण समितीवर महेंद्र घरत यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

सातारा येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेचे सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांनी कामगार नेते महेंद्र घरत यांना पत्र लिहून ही निवड झाल्याचे कळविले आहे. इंटक चे राष्ट्रीय सचिव असणारे महेंद्र घरत न्यू मेरिटाइम जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष देखील आहेत. कामगार क्षेत्रांमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या महेंद्र घरत यांनी शिक्षणक्षेत्रात देखील तितकेच मोलाचे काम केले आहे.

रयत सारख्या अग्रगण्य संस्थेमध्ये उच्च सदस्य समिती वरती निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याने महेंद्र घरत यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची पोचपावती मिळाल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य यांच्या मागिल महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये आगामी दोन वर्षाकरिता महेंद्र घरत यांची निवड करण्यात आली आहे.

निमंत्रीत सदस्य पदी वर्णी लागल्याने सध्या महेंद्र घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.रयतच्या उच्च शिक्षण समितीवर महेंद्र घरत यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महेंद्र घरत यांचे सिटी बेल वृत्त समूहाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आगामी वाटचालीकरता अनेक शुभेच्छा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.