Press "Enter" to skip to content

शारदा संगीत विद्यालयातील दिपसंध्या संगीतरजनी ने संगीत रसिक मंत्रमुग्ध

सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । आवरे । 🔷🔷🔶🔶

संगीताची जादू ही सर्वाना मोहित करत असते कधी मनःशांति कधी अवघडलेल्या अवस्थेतुन मुक्तता तर कधी आजारी माणसाला नव संजीवनी देते, संगीत एक दिव्यशक्ति आहे तसेच साक्षात्कार आहे. दीपावली हा आनंदाचा क्षण दीप हे ज्ञानाचे प्रतीक आहे. असतो मा सत गमय, तमसो मा ज्योतिर्गामय म्हणजे च अंधारातून प्रकाशाकडे दिपावली चा दिवा हा घरोघरी लागो हाच उद्देश ऐन दीपावलीत निगा फौंउडेशन आवरे व सुयश क्लासेस आवरे तर्फे शारदा विद्यालयातिल संगीतरजनी चे आयोजन संगीत रसिकांसाठी करण्यात आले होते.

दिवाळी संध्या ही विषेश भेट सादर केली सदर कार्यक्रमात तुझ्या कृपेने दिन उगवे हा “गगन सदन तेजोमय” माझे जीवन गाणे , शुक्रतारा मंद वारा , नाविकारे वारा वाहे रे ,”आकशी झेप घे रे पाखरा ” आज जाने की झील ना करो , दीपावली मानाये सुहानी मेरे साई के हाथो मे , आली माझ्या घरी ही दिवाळी , “राजा ललकारी अशी घे , उगवला तारा- गर्जा शिवाजी राजा , अश्या बहारदार गाण्यांचा नजराणा उरण पूर्वविभागातील ख्यातनाम गायक संगीत विशारद प्रमोदजी रसाळ , गायिका पूजा मेस्त्री , ऋतुजा गडगे, अशोक कोळी, रसिक ठाकूर (की बोर्ड साथ )आणि विशेष म्हणजे जयदास ठाकूर यांनी अप्रतिम असं तबला वादन रूपक, दादरा , दीपचंदी, भजनी ठेका, संगीत रसिकांसाठी पेश केला. आवरे गावातील व अजुबाजुच्या परिसरतील सर्व संगीत रसिक या कार्यक्रमाने मंत्रमुग्ध झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.