Press "Enter" to skip to content

शेतामध्ये माच करुन पेंढा ठेवण्याची पद्धत होत आहे कालबाह्य

शेती कमी होत असल्याचा परिणाम 🔶🔶🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । 🔷🔷🔷🔷

रायगड हे भाताचे कोठारे म्हणून प्रचलित असून सध्या ह्याच शेतीला औद्योगिक करणांचे ग्रहण लागले असल्यामुळे भात शेती कमी होत चालली आहे.शेती अल्प असल्यामुळे पारंपरिक पध्दतीने शेती न करता तांत्रिक ने शेती केली जाते परिणामी शेतकरी यांच्या जवळ असलेल्या गुरे कमी प्रमाणात झाल्यामुळे लाकडी माच बनवून त्यावरती पेंढा साठविण्याची कला लुप्त होत चालली आहे.

पुर्वी शेती ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतक-याजवळ गुरे ही खूप असायची मात्र गेल्या काही वर्षात औद्योगिकरण तसेच शेतीचे विभाजन झाल्यामुळे शेती ही तुकड्यामध्ये विभागली गेली.त्यातच मुंबई सारख्या धनीकांनी आपली जमिन घेवून त्या ठिकाणी बंगले बांधले गेले आहे.परिणामी लागवडीचे क्षेत्र कमी होत चालले आहे.त्यातच सातत्याने बदलत असलेले हवामान यामुळे मतीत टाकलेला पैसा मिळत नसल्यांची खंत शेतकरी वर्ग करीत आहे.यामुळे शेती लागवड करण्यापेक्षा ती ओसाड पडत चालली आहे.

शेती करणे म्हणजे पुरेसे मनुष्य बळ असणे गरजेचे असते मात्र आता विभक्त कुटुंब उदयास आल्यामुळे एकट्या व्यक्तीला शेती करणे अशक्य होत आहे. त्याच बरोबर शेती नाही तर गुरे नाही.यामुळे पेंढा जमा साठविण्याचे प्रकार बंद झाले.मात्र आजही ग्रामीण भागात लाकडी माच रचून पेंढा साठविण्याची पद्धत ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी अनुभवास मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.