Press "Enter" to skip to content

रसायनीत सुर्यांला अर्ध्य देत छटपूजा साजरी

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔷🔶🔶

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परीसर असल्याने या परीसरात कामानिमित्त व व्यवसायासाठी आलेले हिंदी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने राहत आहेत.हे नागरिक गेल्या पंचवीस वर्ष छठपुजा उत्सव मोहोपाडा तलाव,रिस पुल व पाताळगंगा नदीकाठी मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत.परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने काही बंधने पाळून छठपुजा उत्सव साजरी करण्यात आली.

यावेळी छठपुजेचा व्रत करणाऱ्या महिलांनी सुर्यंदेवाची मनोभावे पूजा केली. रसायनी परीसरातील हिंदी भाषिकांनी चार दिवस अगोदरच उपवास करून तिस-या दिवशी मावलत्या सुर्यांला अर्ध्य देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी मोहोपाडा तलावावर भाविकांची संख्या लक्षणीय होती.मावळत्या सुर्यांला अर्ध्य देण्यासाठी महिला विविध वेशभूषेत पुजेचे साहित्य घेऊन मोहोपाडा तलावाकाठी जमले होते.

यावेळी छटपूजेचा उपवास करणा-या महिलांनी डुबत्या सुर्यांला अर्ध्य देण्यासाठी पाण्यात उभ्या राहून सुर्यपुजन केले.यावेली सुर्यदेवाची प्रार्थंना करुन माझ्या कुटुंबाच्या जीवनात सुखसमृद्धी, आरोग्यसंपन्न राहू दे अशी सुर्यांला विनवणी करुन अर्ध्य दिला तर शनिवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्ध्य देवून उपवासाची सांगता करुन पुजा संपन्न झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.