Press "Enter" to skip to content

गोवे गावासह विभागात शोककळा

रविंद्र पवार याचा आकस्मित मृत्यू सर्वांच्या जिवाला चटका लावून जाणारा 🔶🔶🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔷🔷🔷

रोहा तालुक्यातील मौजे गोवे गावचे सुपुत्र तथा सामाजिक क्षेत्रात नेहमी सक्रिय सहभाग घेणारे तरुण तडफदार रविंद्र धर्मा पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित मृत्यू झाल्याने सर्वानाच धक्का बसला असून पवार परिवारासह गोवे गावावर दुःखाचे डोंगर तसेच कोलाड खांब विभागात शोककळा पसरली आहे.

कुशल कर्तबगार सर्वांशीस समभावनेने वागणारा मेहनती,शांत,मनमिळाऊ आणि सर्वच कामात हिरहीरीने पुढाकार घेणारा तरुण होतकरु असा गावातील सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असणारा रविंद्र पवार वय वर्ष ३९ याचा अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याने अचानकपणे आपल्यातून निघून गेल्याने गोवे गावासह परिसरातील साऱ्यांचेच अश्रू अनावर झाले असून परिसरात दुःखमय शोककळा पसरली आहे.

रविंद्र पवार हा गेली सात ते आठ वर्षे विरार येथे नोकरी करत होता.नोकरी सांभाळत सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होता.यावेळी त्याला श्रद्धांजली अर्पण करतांना गोवे गाव कमेटीचे अध्यक्ष विलास पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की रवींद्र पवार सामजिक क्षेत्रात नेहमी कार्यरत त्यांच्या निधनाने तरूण सामाजिक कार्यकर्ता हरपला आहे.तसेच रायगड जिल्हा भोई समाज संस्थेचे माजी सचिव रामचंद्र शिर्के यांनी श्रद्धांजली वाहतांना आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, रवींद्र पवार यांनी आपले वडील धर्मा पवार याच्या प्रमाणेच सामाजिक कार्यात झोकून दिले होते.त्याच्या निधनाने समजाचा एक सामजिक क्षेत्रातील कार्यात सहभागी असणारा तरुण हरपला असून त्याला रायगड भोई समजाच्या वतीनें श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यांच्या पच्छात त्यांची पत्नी,एक मुलगी,आई,वडील,एक भाऊ,भावजय,तीन बहीणी,पुतणे,मोठा पवार परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि.२५ नोव्हेंबर व उत्तरकार्य शुक्रवार दि.२७ नोव्हेंबर २०२० रोजी राहत्या घरी मौजे गोवे या ठिकाणी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.