Press "Enter" to skip to content

टी व्ही एक दररोजचा आवडता सोबती

टी व्ही एक दररोजचा आवडता सोबती

२१ नोव्हेंबर जागतिक टी व्ही दिन . युनोच्या जनरल असेम्ब्ली ने एक ठराव करून २१ नोव्हेंबर १९९६ या दिवशी जागतिक पातळीवर टी व्ही दिन साजरा करण्यास सुरवात केली .
आज जवळ जवळ प्रत्येकाच्या घरात टी व्ही आहे . आपण आपला बराच वेळ टी व्ही वर कार्यक्रम पाहण्यात घालवितो ते एक करमणुकीचे साधन आहे तसेच त्याचा अतिरेक झाल्यास त्यापासून आपणास आरोग्याच्या समस्यांही उद्भवू शकतात . टी व्ही चा शोध हा एक क्रांतिकारक शोध म्हणावा लागेल . आज आपण अमेरिकेची निवडणूक इथे एका क्षणात आपल्या घरी टी व्ही वर पाहू शकतो . हवामानाची वार्ता एका क्षणात या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण पाहू शकतो त्यामुळे एखादे चक्रीवादळ कोठे सरकते आहे हे आपल्या डोळ्याने पाहू शकतो विद्यार्थी घरी बसल्या शैक्षणिक कार्यक्रम पाहू शकतात . इतकेच काय पण जगात कोठेही चाललेले ऑलिम्पिक सामने अगदी आरामात व आनंदात घरी पाहून त्याचा आस्वाद लुटू शकतो . टी व्ही चाललेले आरोग्याचे धडे उदा योगासने इत्यादी आपण पाहू शकतो व त्याप्रमाणे करू शकतो थोडक्यात ते एक आपल्या आयुष्यात महत्वाचे अंग बनू पाहत आहे . भारतीय दूरदर्शनचे बोधवाक्य आहे ” सत्यम शिवम सुंदरम ‘. टी व्ही माध्यमाचा वापर कसा करावयाचा ते प्रत्येकाच्या हातात आहे . तो जसा कराल तसे त्याचे फायदे अथवा तोटे मिळतीळ . आज एका पाहणीनुसार एक अमेरिकन माणूस दररोज चार तास टी व्ही पाहतो असे निदर्शित आले आहे इतिहास पाहता .टी व्ही चा विकास १८३० पासून सुरू झालेला आपणास दिसून येतो . ग्रॅहम बेल व एडिसन यांनी आवाज व फोटो ट्रान्स्मिट केले होते . विशेष म्हणजे Television हा शब्द १९०७ साली प्रचलीत आला . व तेव्हाच त्याचा समावेश डिक्शनरीत करण्यात आला १९१४ साली जॉन ब्रेड यांनी छायाचित्र हलवून दाखविले होते . टी व्ही शोध मात्र खऱ्या अर्थाने फिलो टेलर फ्रंवर्थ यांनी १९२७ साली लावला होता . त्यावेळी त्याचे वय अवघे २१ वर्षाचे होते . दुसऱ्या महायुद्ध काळात टी व्ही वापर बऱ्याच ठिकाणी करण्यात आला . प्रथम टी व्ही कृष्ण धवल स्वरूपात दाखविले जात होते . कलर टी व्ही ची सुरवात मात्र अमेरिकेत १९५३ साली झाली . रिमोट कंट्रोल ची सुविधा रॉबर्ट एडलर याने १९५६ मध्ये आणली . भारतात मात्र टी व्ही चे युग सुरू होण्यास बराच काळ लागला . शिवकुमारन यांनी त्यावेळच्या मद्रास शहरात टी व्ही चे मॉडेल एका प्रदर्शनात जानेवारी १९५० साली दाखविले होते . १९५९ साली प्रायोजित तत्वावर टी व्ही दाखविण्यास सुरवात झाली . प्रथम टीव्हीचे प्रक्षेपण १५ सप्टेंबर १९५९ दिवशी करण्यात आले . त्यावेळेस एका आठवड्यात तीन दिवस तो दाखविला जात असे . नवी दिल्ली येथे तो लिमिटेड स्वरूपात दाखविला जात होता . मुंबई व अमृतसर येथे मात्र तो १९७२ च्या दरम्यान दिसू लागला आज मात्र टी व्ही चॅनेल ची संख्या अगणित आहे . त्यात केवळ बातम्या देणारे न्यूज चॅनल आहेतच याशिवाय आरोग्य, नाटक, सिनेमा ,खेळ याचे स्वतंत्र चॅनेल सुद्धा आहेत एका अंदाजानुसार भारतात खाजगी वाहिन्यांची संख्या मार्च २०१९ साली जवळपास ९०२ एवढी प्रचंड होती . सप्टेंबर २६ ते २ ऑक्टोबर २०२० या काळात स्टार स्पोर्टस या हिंदी चॅनेल वर सुमारे १. ३ बिलियन लोकांनी यावर खेळ पाहून आनंद लुटला. दूरदर्शनवर पहिली मुलाखत पु ल देशपांडे यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची दिल्ली येथे घेतली होती रामायण व महाभारत या मालिका प्रथम दूरदर्शनवर दाखविण्या आल्या होत्या . त्या त्यावेळेस फारच लोकप्रिय झाल्या होत्या . त्याचे प्रक्षेपण अलीकडे लाकडाउन च्या काळात पुन्हा केले गेले . ते रसिकांना व मुलांना फारच आवडले होते . ३१ ऑक्टोबर २०११ साली महाराष्ट्रात पहिली संगीत वाहिनी सुरू झाली . सिनेमासाठी झी टॉकीज ही वाहिनी नोव्हेंबर २००७ साली सुरू झाली . आज जगात टी व्ही पाहणारी सांख्य दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते २०१७ साली ती १. ६३ मिलियन एवढी होती . तर एका अंदाजानुसार ती २०२३ साली १. ७४ बिलियन एवढी होण्याची शक्यता आहे आज वेग वेगळ्या प्रकारचे टी व्ही बाजारात आहेत . अगदी लहान तीन ते चार इच ते मोठा सिनेमाच्या पडद्याएवढा स्क्रीन असलेलाअ टी व्ही आपण खरेदी करू शकतो . टी व्ही जरी करमणुकीचे एका साधन असले तरीही त्याचा उपयोग मर्यादित काळापुरतेच करावयास हवा . जास्त टी व्ही पाहिल्यास डोळ्यां ना त्रास होण्याची शक्यता आहे . संस्कार या दृष्टीने सुद्धा टी व्ही ची भूमिका फार मोठी आहे . टी व्ही वर अनेक शैक्षणिक व आरोग्यविषयक तसेच पर्यावरण व पक्षी व प्राणी विषयक कार्यक्रम असतात त्यामुळे आपल्या ज्ञानात पडते .पण शृंगारिक सिनेमा , मारामारी दाखविणारी चित्रे व वाहिन्या यामुळे वाईट संस्कार होऊ शकतात त्यामुळे त्याचा वापर कसा होतो यावरच त्याचे यश अवलंबून आहे टी व्ही चा त्याचा वापर आपल्या हितासाठी व कल्याणासाठी तसेच ज्ञानासाठी करणे हे उपयुक्त आहे

शांताराम वाघ सोलापूर

Contact :+91 96234 525 53
E mail: swagh30948@gmail.com

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.