Press "Enter" to skip to content

मेट्रोपॉलिस च्या शिरपेचात सन्मानाचा तुरा

6093 कोविड टेस्ट करणाऱ्या डॉ महिंद्रकर यांचा पनवेल महानगरपालिकेने केला सन्मान 🔶🔶🔶

सिटी बेल लाईव्ह । पनवेल । 🔷🔷🔷🔷

मेट्रोपॉलिस लॅब चे संचालक डॉ प्रदीप महिंद्रकर यांना नुकतेच पनवेल महानगर पालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कोरोना विषाणू संक्रमण होत असतानाच्या काळात तब्बल 6093 RT PCR टेस्ट केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

आयुक्त देशमुख,महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या स्वाक्षऱ्या असणारे प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आले. कोरोना चे थैमान थोपवण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली होती.अशातच RT PCR करणाऱ्या एका प्रयोगशाळेचे रिपोर्ट सातत्याने चुकीचे येऊ लागले.टेस्ट करण्याबद्दल नागरिकांच्यात नकारात्मकता पसरू लागली.अशा वेळेस डॉ प्रदीप महिंद्रकर संचलित मेट्रोपॉलिस लॅब ने पुढाकार घेत टेस्ट करण्याची तयारी दर्शविली.अन्य दोन सेवाभावी संस्थांची त्यांना तोलामोलाची साथ लाभली.

कोरोना विषाणू संक्रमण पूर्ण पणाने गेलेले नाही.थंडीत विषाणू प्रसार वाढेल असा आरोग्य तज्ञांचा कयास आहे.अशा परिस्थितीत मेट्रोपॉलिस लॅब खंबीर पणाने पाठीशी उभी असेल असा विश्वास महानगरपालिकेला वाटतो.RT PCR चे दर कमी झाल्याने टेस्ट करण्याचे प्रमाण वाढणार आहे.दर आणखीन कमी झाल्यास नागरिक स्वयंस्फूर्तीने चाचणी करण्यास येतील अशी सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.एकंदरीतच डॉ महिंद्रकर आणि मेट्रोपॉलिस लॅब यांना आगामी काळात तय्यार राहावे लागेल.

पनवेल महानगरपालिकेचे प्रशस्ती पत्र मिळाल्याने मेट्रोपॉलिस च्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे.पाठीवर थाप मिळाल्याने आपले काम आणखीन जोमाने करण्यास ऊर्जा मिळते असे लॅब च्या वतीने सांगण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.