Press "Enter" to skip to content

सोलिव खैर नग, दुचाकी जप्तीसह दोन आरोपींना वनकोठडी

सुधागडात कोशिंबळे जंगलात सापळा रचून वनविभागाची बेधडक कारवाई 🔷🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔶🔶🔶

सुधागड तालुक्यात वनविभाग वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांची संपूर्ण टीम तालुक्यातील खैराची तस्करी , झाडे तोडणे , वन्य प्राणी व पक्षांच्या बचावासाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे . येथील कोशिंबळे जंगलात सापळा रचून वनविभागाने बेधडक कारवाई करून सोलिव खैर नग, दुचाकी जप्तीसह दोन आरोपींना ताब्यात घेतले .

याप्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि.(20) शुक्रवार पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मा . उपवनसंरक्षक अलिबाग व मा . सहा . वनसंरक्षक अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नागशेत व सुधागड रेंज स्टाफ , यांचेसह सुधागड वनक्षेत्रातील नियतक्षेत्र पिंपळोली कडील मौजे कॉशिबळे राखीव वन क.नं .639 मध्ये दबा धरुन बसले असताना सांयकाळच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी खैर जातीची झाडे तोडून त्याचे सोलीव खैर नग तयार करुन कॉशिबळे व पाटणूस शासकिय वनाच्या हददीतून मोटार सायकलवरून वाहतूक करत असताना आढळून आले.

वन अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांना थाबविण्याचा इशारा केला असता त्यांनी त्याच्याजवळील दूचाकी व त्यावरील सोलीव खैर नग जाग्यावर टाकून अंधाराचा फायदा घेवून पसार झाले . सदर मुददेमाल जप्त करुन पंचनामा नोंदवून कागदपत्रे तयार केली . सदर गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता जप्त करण्यात आलेले वाहन हे अशोक तानाजी पवार , रा . पाथरशेत आदिवासी वाडी ता . रोहा यांचे नावावर असल्याचे कळून आल्याने मौजे पाथरशेत आदिवासी वाडी जाऊन अशोक तानाजी पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले .

त्यांचेकडे अधिक चौकशी करता सदरची दुचाकी श्री . मंगेश रविंद्र पवार वापरत असल्याचे समजल्याने श्री . मंगेश रविंद्र पवार , रा . पाथरशेत व विकास इका जाधव रा . पायरशेत यांना चौकशीकामी ताब्यात घेतले . चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा कबुल केल्याने त्यांना अटक करून मा . न्यायालयासमोर हजर केले असता मा . न्यायालयाने सदर आरोपींना वनकोठडी सुनावली .

नागशेत परिमंडळाकडील नियतक्षेत्र पिंपळोली मौजे कोशिंबळे राखीव वन 639 याठिकाणी कारवाई करण्यात आली असून जप्त केलेली मालमत्ता यामध्ये 1.काळा रंगाची बजाज डिस्कवर 100M त्याचा चेसीस नंबर MD2A57AZ7EWMO8022 इंजिन नंबर PAZWEM50812 ( सदरच्या दूचाकीवर नंबर प्लेट नाही ) अंदाजित किंमत 30000, तसेच सोलिव खैर नग -8 घनमीटर 0.208 किंमत रु . 2821/-
आदींचा समावेश आहे.

सदर प्रकरणी 1. ) भारतीय वन अधिनियम 1927 चे । ) कलम 26 ( डी ) ( ई ) ( एफ ) ( एच ) कलम 65 A अन्वये सदर कलमांपैकी कलम 26 ( डी ) ( एफ ) ( एच ) अजामीनपात्र आहेत . 1 ) 42 ( 1 ) व ( 2 ) , 2 ) महाराष्ट वन नियमावली 2014 चे नियम 31 नियम 82 ( 1 ) व ( 2 ) 3 ) भारतीय दंड संहिता 1860 कलम 34 , कलम 379 4 ) जैवविविधता अधिनियम – 2002 चे कलम 55 ( 1 ) व ( 2 ) ( कलम 58 अन्वये सदर कलम 55 अंतर्गतचे गुन्हे अजामीनपत्र ) अन्वये नागशेत रौ.गु.नं.सी -5 / 2020-21 अन्वये गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे व प्रकरणी पुढील तपास सुरु आहे . दरम्यान दोन्ही आरोपीना दि.(20) रोजी रोहा न्यायालयात हजर करण्यात आले, पुढील कार्यवाही बाबत उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू असल्याचे वनक्षेत्रपाल पाली सुधागड यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.