Press "Enter" to skip to content

माथेरानकरांसह पर्यटकांना प्रतीक्षा नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवेची

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे । 🔷🔷🔷

माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम येन भरात असताना मिनिट्रेन सफारीचा पर्यटकांना असलेली ओढ दिसून येत असून नेरळ माथेरान मिनिट्रेन च्या फेऱ्या बंद असल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी बोलून दाखविली.

ब्रिटिशांनी वसविलेले व देशातील इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी असलेले पर्यटन स्थळ म्हणून माथेरान नावारूपास येत आहे,येथे आजही ब्रिटिशकालीन कायदे लागू असल्याने इतर पर्यंतनस्थळाच्या तुलनेत आधुनिकीकरणात व पर्यंतनवाढीच्या सोईसुविधांमध्ये मागे पडलेल्या माथेरान ची मिनिट्रेन सेवा ही सर्वात महत्वाची जमापुंजी ठरलेली आहे, सर आदमजी पिरभोय यांनी स्वखर्चातून सुरू केलेली ही मिनिट्रेन सेवा एका शतकाहून अधिक काळ माथेरानच्या सेवेत अविरत सुरू आहे.

1905 साली मुहूर्तमेढ झालेली ही सेवा अखंड सुरू होती पण मागील काही वर्षांपासून नेरळ माथेरान सेवेकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दोनवर्षापासून ही सेवा पर्यटकांसाठी बंदच आहे व सुरक्षिततेचे कारण देत हया मार्गावर रेल्वे प्रशासनाने करोडो रुपये आता पर्यंत खर्च केले आहेत पण ही सेवा अजूनही बंदच आहे ,ही सेवा केव्हा सुरू होईल ह्या विषयी रेल्वे प्रशासन काहीही बोलत नसल्याने ह्या वर्षीही माथेरान कर नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवेला मुकणार असेच चित्र सध्या दिसत आहे.

नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवा सुरू राहिल्याचा फायदा येथे येणाऱ्या पर्यटकांना मिळतो कमी खर्चात थेट गावामध्ये येण्याचा हा एकमेव मार्ग आहे मिनिट्रेनने आल्यास पर्यटकांनादस्तुरी या मुख्य प्रवेशद्वारावर ज्यांना माथेरान विषयी काहीएक सहानुभूती नाही की स्वारस्य नाही अशा फसव्या व्यावसायिकांकडून गावात येण्यासाठी नेहमीच होणाऱ्या वाहतुकीच्या फसवणुकी पासून सुटका तर मिळतेच पण मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत ही होत असते तसेच वाहनकोंडी, वेळेची बचत,व अर्ध्या माथेरानचे दर्शन ह्या प्रवासा दरम्यान होत असल्याने पर्यटक नेरळ माथेरान प्रवासास प्राधान्य देत असतात.

मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहारांपासून संलग्न असल्याने अनेकजण फक्त मिनिट्रेन साठी माथेरानला येत असतात व हेच येथील मुख्य आकर्षण असल्याने माथेरान साठी मिनिट्रेन सेवा सुरू असने नेहमीच महत्वाचे ठरत असते त्यामुळेच ह्या दिवाळी हंगामात नेरळ माथेरान सेवा बंद असल्याने येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत असून ही सेवा सुरू असावी अशी खंत ते बोलून दाखवत आहेत.

महाराष्ट्रातील इतर पर्यटनस्थळांच्या तुलनेत माथेरान हे आजही मागास पर्यटनस्थळ असल्याचे संबोधले जाते याचे मुख्य कारण म्हणजे मिनिट्रेन हाच येथील पर्यटनाचा कणा असल्याने ती व्यवस्थित सुरू रहावी ही प्रत्येक माथेरान करांची तसेच पर्यटकांची नेहमीच मागणी राहिलेली असल्याने रेल्वे प्रशासनाने नेरळ माथेरानसेवा सुरळीत सुरू करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

लहानपणी शाळेतून सहलीला आलो असतानाच्या मिनिट्रेन सफरीच्या आठवणी आजही ताज्या आहेत म्हणून मुलांना घेऊन पुन्हा माथेरान ला आलो असताना नेरळ माथेरान मिनिट्रेन बंद असल्याचे पाहून वाईट वाटले

जिग्नेश पटेल, पर्यटक गुजरात
महाराष्ट्रात हिलरेल्वे सुरू असलेलं माथेरान हे एकमेव ठिकाण असल्याने कुटुंबासह तिच्या सफारीचा आनंद घेण्यासाठी माथेरानला आलो असता नेरळ माथेरान सेवा बंद असल्याचे समजले त्यामुळे नेरळ ते माथेरान हा प्रवास करताना हा प्रवास किती खर्चिक आहे हे लक्षात आले त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांसाठी हे सेवा अखंड सुरू राहायला हवी.

संजोग जाधव,पर्यटक वसई

पर्यटकांची मुख्य मागणी ही नेहमीच नेरळ माथेरान मिनिट्रेन करिता राहिलेली आहे. दोन ते अडीच तासांच्या या रेल्वेच्या प्रवासात त्यांना खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप होता येते. इथे आल्याचे सार्थक वाटते. ही सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असून लवकरच याबाबत रेल्वे मंत्र्यांना इथल्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठीआणि पर्यटकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ही मिनिट्रेन किती फायदेशीर आहे याबाबत भेट घेऊन नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवा सुरू करण्यासाठी आमचे शिष्टमंडळमार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.

प्रसाद सावंत –गटनेते माथेरान नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.