Press "Enter" to skip to content

सुअस्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची सर्वात प्रगत वैद्यकीय सुविधा आता नवी मुंबईमध्ये उपलब्ध

कळंबोली येथे १०० बेड असलेल्या वेगळ्या कोविड केंद्राची सुविधा

सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / नवी मुंबई #

सुअस्थ हॉस्पिटल हे ३५० बेड्स असलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स हेल्थकेअर नुकतेच कार्यरत झाले आहे आणि नवी मुंबईतील रहिवाशांसाठी या हॉस्पिटलची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ५००,०००चौरसफूट जागेवर असलेल्या या हॉस्पिटलमध्ये प्रवेश व निकासासाठी अनेक प्रवेशद्वार आहेत. या हॉस्पिटलची सुरक्षाव्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जांनुसार आहे, ज्याची डिझाईन डॉ. संजीव कनोरिया (एमआरसीएस,एमबीए,पीएचडी) यांनी तयार केलेली आहे. या हॉस्पिटलमध्ये अधिक रुग्ण भरती करण्याची आणि त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा आहे. हॉस्पिटलमध्ये रूग्णांना उत्तम सेवा दिली जाते.डॉ.संजीव कनोरिया हे युनायटेड किंगडममधील सुप्रसिद्ध हेल्थकेअर उद्योजक व लिव्हर ट्रान्सप्लाण्ट सर्जन आहेत. त्यांचे अनेक बहुमूल्य लेख व वैज्ञानिक संशोधन प्रकाशित करण्यात आले आहेत.या विभागातील कोविड केअर सुविधांची आत्यंतिक गरज लक्षात घेता, सुअस्थ हॉस्पिटलने वेगळे १०० बेडचे कोविड केअर केंद्र सुरू केले आहे.हे केंद्र हॉस्पिटलमधील इतर विभागांपासून वेगळे असून त्याचे प्रवेशद्वारदेखील वेगळे आहे.पनवेल महानगरपालिकेने (पीएमसी) सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे केंद्र कार्यरत आहे.परिसराचे नियमित निर्जंतुकीकरण,सेफ्टीगिअर्स व पीपीईकिट्सचा वापर आणि आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची तपासणी अशी योग्य ती काळजी घेतली जात आहे. सध्यस्थिती आणि नॉन-कोविड रूग्णांना सामना करावा लागत असून या अवघड परिस्थितेचे गांभीर्य ओळखता सुअस्थ हॉस्पिटल, वेगळे प्रवेशद्वार, कक्ष आणि समर्पित कर्मचारी वर्गाची सुविधा देत असून रूग्णांना सेवा देण्याची आणि त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे.
डॉ. संजीव कनोरिया यांच्या म्हणण्यानुसार, ”आम्हाला नवी मुंबई,पनवेल शहरातील तसेच रायगड जिल्ह्यातील रहिवाश्यांना, आमची सेवा देण्याचा आनंद होण्यासोबत सन्मानित वाटत आहे. सुअस्थ हॉस्पिटलचा सर्वांसाठी हेल्थकेअर सेवा, सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे. तसेच आमचा या विभागातील प्रगत आरोग्यसेवांच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्याचादेखील उद्देश आहे.आमचे अनुभवी कर्मचारी, प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान, किफायतशीर दर,विचारपूर्वक केलेल्या पायाभूत सुविधा आणि प्रतिबंध,केअर व काळजीप्रती एकीकृत दृष्टिकोन,सुअस्थ हॉस्पिटलला इतरांपेक्षा खास बनवतात. आम्हाला आमची सेवा देताना, देशाला कोरोना महामारी विरोधी लढ्यामध्ये सहाय्य करण्याचा अभिमान वाटत आहे.” सुअस्थ हॉस्पिटल २० हून अधिक स्पेशालिटी केंद्राच्या एकीकृत कार्यपद्धतींच्या माध्यमातून रूग्ण-केंद्रित केअर सुविधा देते. हॉस्पिटलच्या विशेष विभागांमधे ऑर्थोपेडिक्स, ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी, ईएनटी ,कार्डियोलॉजी, ऑप्थॅल्मोलॉजी, सायकोलॉजी,पेडिएट्रिक्स आणि विविध सपोर्ट केअर सुविधांचा समावेश आहे. सुअस्थ हॉस्पिटलने रेला इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हरट्रान्स प्लांट, नारायण हृदयालय, किमया किडनीकेअरआणिमँचेस्टर मधील क्रिस्टी कॅन्सर सेंटर अशा प्रख्यात हेल्थकेअर स्पेशालिटी केंद्रांसोबत सहयोग जोडला आहे. यामुळे येथील नागरिकांना लोकांना किफायतशीर दरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रगत वैद्यकीय सुविधा देण्यामध्ये मदत होईल. सुअस्थचे वेगळे प्रसूती संकुलदेखील आहे.या संकुलामध्ये वेगळेऑपरेशनथिएटर,एनआयसीयू (निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिट) आणि वेगळ्या डिलिव्हरी व खाजगी रूम्स असणार आहेत. सुअस्थची इंटीरिअर डिझाईन सध्याच्या महामारीसारख्या उध्दभवलेल्या अवघड घटनांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. म्हणूनच यामध्ये वेगवेगळे प्रवेशद्वार बनवण्यात आले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.