Press "Enter" to skip to content

लाॅकडाऊन सपशेल अपयशी : कोरोना रुग्णांचा रेकॉर्ड ब्रेक

पनवेल तालुक्यात आज तब्बल 251 नवीन रुग्ण : चार जणांचा मृत्यू

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मृत्यूने शंभरी गाठली : एकूण 130 बळी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

पनवेल तालुक्यात आज कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. आज तालुक्‍यात तब्बल 251 नवे रुग्ण सापडले याच महानगरपालिका क्षेत्रात 180 तर ग्रामीण भागात 71 रुग्ण सापडले.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मृत्यूने देखील आज शंभरी गाठली आज महानगरपालिके च्या क्षेत्रात चार रुग्णांचा मृत्यू झाला तालुक्यात आज पर्यंत एकूण एकशे तीस जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण 156 रूग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान पनवेल मध्ये अशाप्रकारे रुग्णांचा रेकॉर्डब्रेक होत असल्याने महानगरपालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात केलेले कडक लॉकडाऊन सपशेल अपयशी झाल्याचे बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.