Press "Enter" to skip to content

जेएनपीटीने ऑक्टोबर महिन्यात 1,07,530 मेट्रिक टन एलपीजीची केली हाताळणी

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुभाष कडू । 🔷🔷🔷

जेएनपीटीने ऑक्टोबर 2020 मध्ये सात जहाजांच्या माध्यमातून जेएनपीटी -लिक्विड कार्गो टर्मिनलवर 1,07,530.67 मेट्रिक टन एलपीजीची हाताळणी करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ही आजवरची सर्वाधिक हाताळणी आहे. या अगोदर ऑगस्ट 2019 मध्ये सर्वाधिक 92,877 मेट्रिक टन एलपीजीची हाताळणी करण्यात आली होती.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजीचे वितरण पूर्ण करण्यासाठी जेएनपीटी एलपीजी जहाजांच्या हाताळणीस प्राधान्य देत आहे. तसेच सुलभ व्यापारासाठी आणि आयात-निर्यात व्यापारासाठीचे पहिल्या पसंतीचे बंदर बनण्यासाठी जेएनपीटीने आपली कार्यप्रणाली कार्यक्षमता आणि हाताळणी क्षमता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक केली आहे. त्याचा परिणाम माहे एप्रिल ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत जेएनपीटीने 5,66,815 मेट्रिक टन एलपीजीची हाताळणी केली जी मागील वर्षी याच कलावधीत हाताळणी केलेल्या 4,96,052 मेट्रिक टनांच्या तुलनेत 14.27% अधिक आहे.

जेएनपीटी लिक्विड कार्गो टर्मिनलवर हायस्पीड डिझेल, मोटरस्पिरिट, खाद्यतेल इत्यादी आवश्यक वस्तुंचीही हाताळणी करीत आहे. 13.5 कि.मी. च्या क्रायोजेनिक पाइपलाइनद्वारे एलपीजी जेएनपीटी लिक्विड जेट्टी पासून उरण स्थित एलपीजी बीपीसीएल बोटलिंग प्लांट पर्यंत पोहचविला जातो. त्यानंतर एलपीजीचे वितरण रेल्वे / रस्तेमार्गे / पाइपलाइनद्वारे महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये केले जाते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.