Press "Enter" to skip to content

वीज मंडळ कामगारांची ऊर्जा मंत्र्यांसोबत ची बोलणी फिसकटली

महाराष्ट्र राज्यावर अंधाराचे सावट येणार ? राज्यातील तिन्ही वीज कंपन्यातील ८६००० वीज कामगार,अभिंयते व अधिकारी जाणार संपावर ! 🔷🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । नागपूर । 🔶🔶🔶🔶

महाराष्ट्र राज्यातील वीज उधोगातील काम करणाऱ्या कर्मचारी,अभिंयते व अधिकारी यांच्या २५ कामगार व अभिंयते सघंटनानी एकञ ऐवुन वीज कंपन्यातील ८६००० वीज कामगार,अभिंयते व अधिकारी याना बोनस व सानुग्रह अनुदान व सन २०१८ मध्ये झालेल्या पगारवाढ कराराचा दुसरा हफ्ता देण्याच्या मागणीसाठी प्रञ देवुन केली होती. डाॕ.नितीन राऊत ऊर्जामंञी यांच्या समवेत झालेल्या आज झालेल्या चर्चेत ठोस निर्णय न झाल्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपन्यातील ८६००० वीज कामगार,अभिंयते व अधिकारी याना बोनस व सानुग्रह अनुदान/पगारवाढ फरक मिळण्याच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कामगार नेते कृष्णा भोयर

दि.१२.११.२०२० रोजी संपकरी सघंटना समवेत मा.असिम गुप्ता ऊर्जासचिव व तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी बैठक घेवुन चर्चा केली व बोनस/सानुग्रह अनुदान देता येणार नाही ही भुमिका घेतली.तिन्ही वीज कंपन्यातील कामगार,अभिंयते व अधिकारी सतत वीज कंपन्यांच्या प्रगती करीता झटत आहे.कोविद-१९ महामारी,निसर्ग वादळ व महापुरात जोखीम पत्करुन चांगले काम केलेले आहे.सन २०१९-२० या आर्थिक वर्षात महावितरण कंपनीस रु.६८०१८ कोटी महसुल मिळवुन दिला.महावितरण कंपनीस रु.१५० कोटी तर महानिर्मिती कंपनीस रु.१३१ कोटी तसेच महापारेषण कंपनीस सुध्दा रु.१०० कोटीच्या वर नफा मिळवुन दिलेला आहे.

एप्रिल २०२० पासुन लाॕकडाऊन असल्यामुळे वीज ग्राहक याना रिडिंग न करता आॕवरेज बीले देणे व बिल वाटप न झाल्यामुळे वीज ग्राहकांना महावितरण कंपनीने एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० रु.३२४९५ कोटीची वीज बिले दिली त्यापैकी रु.२३,७५९ कोटीचे बीले वीज ग्राहक यांनी भरली.त्यामुळे महावितरण कंपनीस ८,७३६ कोटी रुपयाचा महसुल कमी मिळाला.महावितरण कंपनीची एकून थकबाकी रु.५६,७४७ कोटी रुपये असुन सर्वात जास्त थकबाकी शेतकऱ्यांच्याकडे मार्च २०२० पर्यत रु.४१,५३८ कोटी,सरकारी दवाखाने,शाळा व इतर सरकारी कार्यालये यांच्याकडे रु.१,९९९ कोटी आहे.घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वीज ग्राहक रु.८,०६२ कोटी, महानगरपालिका,नगरपालीका,नगरपंचायत यांच्याकडे रु.२५१ कोटी,दिवाबत्ती रु.४,८९५ कोटी अशी आहे.ही वसुल करण्यासाठी वीज कामगार व अभिंयते प्रयत्न करत असताना अनेक अडचणी निर्माण करण्यात येतात.

सन २०१९-२०२० आर्थिक वर्षात केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक मा.ऊर्जामंञी,मा.ऊर्जा राज्यमंत्री व तिन्ही कंपनीचे प्रशासन यांनी केलेली आहे.कामगार, अभिंयते व अधिकारी यानी चांगले काम केलेले असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी बोनस/सानुग्रह अनुदान दयावे अशी अपेक्षा होती.पगारवाढ दुसरा हफ्ता दिला तर रु.३७० कोटी व बोनस सानुग्रह अनुदान दिले तर रु.१२५ कोटी खर्च अपेक्षित आहे.पगारवाढ फरक देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विघुत नियामक आयोगाने मजुंरी प्रदान केलेली आहे.

दि.१३.११.२०२० रोजी डाॕ.नितीन राऊत ऊर्जामंञी,मा.असिम गुप्ता प्रधान ऊर्जासचिव,मा.दिनेश वाघमारे व्यवस्थापकीय संचालक महापारेषण कंपनी,मा.सजंय खदारे व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती कंपनी,(संचालक वित्त/मासं), मुख्यऔधौगिक सबंध अधिकारी व २५ सघंटनाचे पदाधिकारी याची बैठक झाली माञ बैठकीत ठोस निर्णय न झाल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.