Press "Enter" to skip to content

शेकाप महाआघाडी सोबत फरफटत जाणार नाही !

महाविकास आघाडीने मराठवाडा पदवीधर मतदार संघात शेकापला गृहीत धरू नये : भाई मोहन गुंड 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । बीड । प्रतिनिधी । 🔶🔶🔶

महाराष्ट्रात आणि देशामध्ये भाजप सरकार हे शेतकऱ्याचे विरोधी भूमिका घेत असल्यामुळे धर्मनिरपेक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शेतकरी कामगार पक्षाने एक ही उमेदवार लोकसभेला न देता पाठिंबा दिला. विधानसभेला देखील राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा देऊन मराठवाड्या मध्ये देखील एक जागा न मागता शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक पणाने मराठवाड्यामध्ये मित्र पक्ष म्हणून निवडनुकीत साथ दिली. मात्र तालुका जिल्हा स्थानिक शासकीय समितीमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात कुठल्याच शेकापच्या कार्यकर्त्यांना स्थान दिले नाही आणि आज होऊ घातलेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघांमध्ये देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा एक दौरा पूर्ण झाला मात्र स्थानिक पातळीवर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणुन स्वयंघोषित शेकापचा पाठिंबा असल्याचा दिंडोरा पिटवत आहेत.

ज्यांना फक्त आम्ही निवडणुकीत पूरते हवे आहोत त्यांनी आम्हाला गृहीत धरू नये,आशा इशारा राज्य मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे, शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील व मराठवाड्यातील पक्षाच्या जेष्ठांबरोबर चर्चा करून पदविधरची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मत भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.