Press "Enter" to skip to content

कोणत्याही कोळी वाड्यांना SRA प्रकल्प लागू देणार नाही : राज ठाकरे

कोळीवाडा गावठणांतील घरांना तसेच गावठाणाना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोळी बांधवांचे राज ठाकरेंना साकडे 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । धम्मशील सावंत । 🔶🔶🔶

कोणत्याही कोळी वाड्यांना SRA प्रकल्प लागू देणार नाही अशी ग्वाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिली. विविध प्रश्न व मागण्या घेऊन आगरी कोळी बांधवांचे शिष्टमंडळ बुधवारी दि.(11)रोजी कृष्णकुंज वर धडकले. व आपले गाऱ्हाणे राज ठाकरे यांच्याकडे मांडले.

सरकारने कोळीवाडयांना SRA घोषित करून अपमानित केले . त्यानंतर कोळीवाड्यातून जमिन हक्क मिळावा म्हणून गावठण हक्काची चळवळ सुरू झाली . शिवसेना – भाजपा युती सरकारने कोळीवाडा गावठणे सीमांकित करण्याचा चांगला निर्णय घेतला . परंतु मुंबईतील मूळ भूमीपुत्र असलेला आगी कोळी , भंडारी , ईस्टइंडियन , आदिवासी समाजाची एकूण दोनशे गावठणे आहेत . केवळ १२ ते २० कोळीवाडयाचे सीमांकन करण्यात आले . मात्र महसूल विभागाने मालकी हक्क कागदपत्रे व नकाशे आजही दिली नाहीत . या प्रश्नावर आपण लक्ष घालून सागरपुत्र समाजास न्याय दयावा . अशी मागणी कोळी समाजबांधवांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन केली.

यावेळी आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील, विजय वरळीकर, जयेश आक्रे, भुवनेश्वर धनु, निकोल्स अलमेडा, राजेश्री भांजी, नयना पाटील, हरीलाल वाडकर, अरविंद साने आदी उपस्थित होते.

कोळी बांधवांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या


1. कोळीवाडयाचा हजारो वर्षांचा इतिहास पहाता येथील घरे , मोकळया वापरातील जागा , मासळी मार्केट , जाळी विनण्याच्या जागा , रस्ते , सार्वजनिक वापरातील वस्तू आणि जागा यांना गावठण हक्क आणि विकास यातून मालकी हक्क ( पॉपर्टीकार्ड मिळून ) स्वतंत्र विकासाचा अधिकार मिळावा .

२ . कोळीवाडे आणि समुद्राचा अधिकार समुद्रावरील व्यवसायाचे अधिकार शासनाने मान्य करावेत .

3. मासळी मार्केट कोळीवाडा आणि गावठणाचा सागरी व्यापार जलवाहतूक , रेती , मासेमारी , मिठागरे हे पारंपारिक अधिकार आहेत . त्यानुसार मुंबईतील सर्वत्र मासळी मार्केट मधील जागेचा मालकी हक्क आणि विकासाचा अधिकार मासळी विकणा – या महिलांना मिळावा . उदा : – भाऊचा धक्का , ससुंडॉक , मरोळ मार्केट ( सुके व ओले मासे ) , क्रॉफड मार्केट , हे मुंबईतील पमुख मार्केट आहे .

4. जमिनीवरची शेती तसेच मच्छिमारांच्या समुदावरची शेती म्हणजेच मासेमारी . जमिनीपमाणे समुद्रातील मासेमारीच्या जागेची मालकी अधिकार सरकारने मान्य कारावा . कोस्टल रोड , शिवडी सीलिंग , शिवस्मारक यात वाधीत होणा – या मच्छिमारांना पकल्पगस्त घोषित करून नव्या भूसंपादन कायदयाने त्यांचे पुनर्वसन करावे .

5. कृषि खात्याप्रमाणेच मासेमारीला स्वतंत्र मंत्रालय असावे . त्याचे स्वतंत्र आर्थिक अनुदान शासनाने दयावे.कर्ज पुरवठा करावा विकास योजना राबवाव्यात .

  1. कोळीवाडे यातिल मातृसत्ता , हुंडा नाकारणारी , एकविरा संस्कृती , खादयसंस्कृती , कोळी नृत्यसंस्कृती , पर्य टकांना आकर्षित करणारी आहे . या परिसराचे भौगोलीक स्थान पुरातत्वीय इतिहास पाहता कोळीवाडयांचे संवर्धन करून गोवा , मालवण प्रमाणे येथिल पर्यटन उद्योगास भूमीपुत्रांना प्रोत्साहन दयावे . उदा : – वसई विरार , पालघर , रायगड येथील जागेचा पर्यटकांसाठी विचार करावा .

7. मागिल दोन हजार वर्षापासूनचे गॅजेटचे पुरावे देशाचा सागरी व्यापार छत्रपती शिवरायांच्या आरमारातील सागरपुत्र , आगरीकोळी , कराडी , भंडारी , ईस्टइंडियन यांचे व आदिवासी यांचे स्थान पाहता येथिल भूमीपुत्रांना सागरी व्यापार आणि नवदलांचे प्रशिक्षण देणारे विदयापीठ मुंबईत उभारावे .

8. समुद्रावरील पर्यटन , जलवाहतुक , व्यापार , सागरी पोलीस , नवदल यात भूमीपुत्रांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये ३० टक्के आरक्षण दयावे .

9. मुंबईत मच्छिमार बांधवांसाठी भव्य कोळी भवन उभारावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी कोळी बांधवांना न्याय मिळवून देणार असल्याचे राज ठाकरे यांनी आश्वाशीत केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.