Press "Enter" to skip to content

कोरोना लस तयार करणाऱ्या ‘या’ फॉर्मा कंपनीवर सायबर हल्ला

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । 🔷🔷🔷

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सध्या सर्व देश लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी जगातली नावाजलेल्या कंपन्या दिवसरात्र एक करून काम करत आहेत.

सध्या हॅकर्सने या फॉर्मा कंपन्यांवर नजर ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील फॉर्मा कंपन्यांवर सायबर हल्ले केले जात आहे.

याआधी डॉक्टर रेड्डीज लॅबवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध फार्मा कंपनी लुपिनवरही सायबर हल्ला झाला आहे.

याआधी 15 दिवसांपूर्वी डॉक्टर रेड्डीज लॅबवर हल्ला झाला होता. औषध उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाश्चात्य देशातील प्रसिद्ध फॉर्मा कंपन्यांवर सायबर हल्ले झाले होते.

भारतातील हा पहिलाच प्रकार आहे. हॅकर्स सध्या महत्त्वपूर्ण डेटाला लक्ष्य करत आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत असे सायबर हल्ले वाढत जातील

संकलन : अजय शिवकर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.