Press "Enter" to skip to content

मराठी माणूस झाला अमेरीकेचा आमदार

तब्बल 93 टक्के मते खिशात घालत मराठमोळे श्री ठाणेदार अमेरिकेत आमदारपदी 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । स्पेशल रिपोर्ट । अजय शिवकर । 🔶🔶🔶

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी झालेल्या निवडणुकीत मराठमोळे डेमोक्रेटिक पक्षाचे भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी आमदारकी मिळवली आहे.

मिशिगनमधून तब्बल 93 टक्के मते खिशात घालत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराचा धुव्वा उडवला आहे.

65 वर्षीय ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून आमदार होण्याचा मान मिळवला असून एकूण मतांपैकी 93 टक्के मतदारांचा कौल मिळवला आहे.

दरम्यान, ठाणेदार हे मूळ बेळगावचे असून मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 24 व्या वर्षी 1979 मध्ये ते अमेरिकेला स्थायिक झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.